टेक्नोलाॅजी

Agri Machinery: शेती कामाकरिता परवडणाऱ्या किमतीतील रोटावेटर घ्यायचा आहे का? तर महिंद्राचा रोटावेटर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Agri Machinery:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागल्याने शेतीची अनेक कामे आता कमीत कमी वेळेत आणि कमीत खर्चात पूर्ण करता येणे शक्य झाल्याने शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत झाली आहे.

शेतीच्या पूर्व मशागतीपासून ते पिकांची लागवड, आंतरमशागत तसेच पिकांची काढणी इत्यादी प्रकारच्या विविध शेतीकामांकरिता आता यंत्र विकसित करण्यात आलेले आहेत. शेती कामाच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीची पूर्व मशागत ही पीक उत्पादनाच्या बाबतीत खूप महत्त्वाची प्रक्रिया असते व याकरिता ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी,

रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करणे आणि पिक लागवडी करिता जमीन तयार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या सर्व कामांकरिता देखील अनेक ट्रॅक्टरचलीत यंत्र विकसित करण्यात आलेले आहेत व यामध्ये नांगरणी केल्यानंतर किंवा नांगरणी शिवाय जमीन तयार करायचे असेल तर आपण बऱ्याचदा जमीन भुसभुशीत करण्यासाठी रोटावेटर या यंत्राचा वापर करतो.

हे एक ट्रॅक्टर चलीत यंत्र असून अगदी नांगरणीत निघालेली ढेकुळ देखील बारीक करण्याची क्षमता या यंत्रात असते. सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे रोटावेटर विक्रीसाठी उपलब्ध आहेत व त्यामुळे जर कुणाला रोटावेटर घ्यायचे असेल तर नेमका कोणत्या कंपनीचा रोटावेटर घ्यावा याबाबत शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो.

त्यामुळे आपण या लेखामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा  महिंद्रा महाव्हेटर रोटाव्हेटरची माहिती घेणार आहोत जो शेतीकामासाठी खूप कार्यक्षम असा रोटावेटर आहे.

 शेती कामासाठी महिंद्रा महाव्हेटर रोटाव्हेटर ठरेल फायद्याचा

हा रोटावेटर हेवी ड्युटी रोटरी टिलर म्हणजेच रोटावेटर असून खूप  टिकाऊ आणि कमीत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो. कडक तसेच ओलसर आणि सुकलेल्या अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हा रोटावेटर उत्तम प्रकारे काम करतो.

तसेच पिकांचे अवशेष देखील संपूर्णपणे बारीक करण्यासाठी हा कार्यक्षम असून कापूस तसेच मका व उसासारख्या पिकांचे अवघड अवशेष देखील उत्तम पद्धतीने बारीक करून व्यवस्थित पद्धतीने पुढील पिकासाठी शेती तयार करण्यासाठी मदत करतो.

महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून या रोटावेटरच्या वापराकरिता 33 ते 52hp क्षमतेचा ट्रॅक्टर वापरावा अशी शिफारस केलेली आहे.

 महिंद्रा कंपनीच्या या रोटाव्हेटरची खास वैशिष्ट्ये

1- महिंद्रा कंपनीचा हा रोटावेटर सर्व प्रकारच्या मातीमध्ये वापरण्यास सक्षम आहे.

2- हा रोटावेटर 36,42,48,54 आणि साठ ब्लेडमध्ये उपलब्ध आहे.

3- महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून या रोटावेटरच्या उत्तम वापराकरिता 33 ते 52 क्षमतेचा ट्रॅक्टर वापरण्याची शिफारस केली आहे..

4- कंपनीच्या माध्यमातून या रोटावेटरला मल्टी स्पीड टाईप गियरबॉक्स दिलेला आहे व गिअर ड्राईव्ह टाईप ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

5- पिकांचे अवशेष मुळासकट काढून बारीक करण्याची क्षमता यामध्ये असून पुढील पिकासाठी चांगल्या प्रकारे जमीन तयार करण्यासाठी हा रोटावेटर महत्त्वाचा आहे.

6- तसेच महिंद्रा कंपनीच्या या रोटावेटरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये कुठल्याही मोडमध्ये ठेवून याला चालवू शकतात.

7- महिंद्रा कंपनीच्या या रोटावेटरचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा बॉक्स हा शेतात जेव्हा काम सुरू असते तेव्हा गिअरबॉक् ला सुरक्षित ठेवण्याचे काम करतो.

 किती आहे किंमत?

महिंद्रा कंपनीच्या या रोटावेटरची किंमत साधारणपणे 90 हजारापासून ते एक लाख 28 हजार रुपये दरम्यान आहे. वेगवेगळे मॉडेल आणि आकारानुसार ही किंमत वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय कंपनीने या रोटावेटरसोबत दोन वर्षाची वारंटी देखील दिलेली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil