Airtel Prepaid Plan : 84 दिवसांच्या वैधतेसह वापरता येईल अनलिमिटेड 5G डेटा, किंमत 10 रुपयांपेक्षाही कमी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airtel Prepaid Plan : Airtel कडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक शानदार रिचार्ज प्लॅन आहेत. यात पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्जचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे.

ज्यात ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड 5G डेटा वापरता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनची प्रतिदिन किंमत 10 रुपयांपेक्षाही कमी आहे. यात कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे फायदे उपलब्ध करून दिले आहेत. जाणून घेऊयात.

मिळेल 84 दिवसांची वैधता

किमतीचा विचार केला तर हा एअरटेलचा 839 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन आहे. 839 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा आणि वैधता 84 दिवस मिळते. म्हणजेच, तुम्हाला फक्त एकदा रिचार्ज करावा लागेल. 84 दिवस कोणताही रिचार्ज तुम्हाला करावा लागणार नाही.

या प्लॅनची ​​दैनिक किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. त्याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. समजा जर तुमच्या भागात Airtel चे 5G नेटवर्क उपलब्ध असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अनलिमिटेड 5G डेटा वापरता येईल.

परंतु फायदे इथेच संपत नाहीत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये, ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटासह Apollo 24|7 सर्कल, मोफत Wynk Music, HelloTunes आणि RewardsMini सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात OTT फायदे उपलब्ध आहेत.

मोफत मिळतील 15 OTT सबस्क्रिप्शन

कंपनीच्या या शानदार प्लॅनसह, ग्राहकांना डिस्ने हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनचा लाभ ३ महिन्यांसाठी आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले ८४ दिवसांसाठी मोफत मिळेल. हे लक्षात घ्या की Airtel Xstream Play सबस्क्रिप्शनसह, वापरकर्ते एकाच लॉगिन अंतर्गत 15 OTT प्लॅटफॉर्मवरून सामग्री अॅक्सेस करता येईल.

या प्लॅनसह कंपनीच्या ग्राहकांना Airtel ची अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केवळ Airtel च्या 5G कव्हरेज क्षेत्रात राहत असणाऱ्यांसाठी आहे. यासाठी, वापरकर्त्याला सर्वात अगोदर त्याच्या Airtel Thanks खात्यावर जावे लागणार आहे. त्यानंतर त्याला अनलिमिटेड 5G डेटा ऑफरचा दावा करावा लागणार आहे. अनलिमिटेड 5G डेटा लाभासह रिचार्ज करत असताना वापरकर्त्याला प्रत्येक वेळी दावा करावा लागणार आहे.