Amazon Great Summer Sale : स्वस्तात मिळत आहेत iPhone, Samsung आणि OnePlus सारखे जबरदस्त फोन, बघा काय आहे ऑफर?

Content Team
Published:
Amazon Great Summer Sale

Amazon Great Summer Sale 2024 : ॲमेझॉनवर सध्या ग्रेट समर सेल 2024 सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेलमध्ये अगदी ॲपल पासून सॅमसंग पर्यंतचे फोन स्वस्त दरात लिस्ट करण्यात आले आहेत.

हा सेल ॲमेझॉनवर 2 मे 2024 रोजी दुपारी 12 पासून सुरु होईल. ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये अनेक ब्रँडेड स्मार्टफोन, स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर प्रचंड सवलत मिळत आहे. सध्या आयफोन, वनप्लस आणि सॅमसंगसह अनेक सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन स्वस्तात मिळत आहे, जे प्राइम सदस्य आहेत त्यांना या ऑफर अंतर्गत आणखी चांगला डिस्काऊंट मिळणार आहे.

iPhone 13

iPhone 13 128GB मॉडेल Amazon Great Summer Sale 2024 मध्ये 48,499 च्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही आणखी 1,000 पर्यंत अतिरिक्त सवलत मिळवू शकता. तसेच 44,250 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि त्यावर नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE4

OnePlus चा लोकप्रिय OnePlus Nord CE4 Amazon ग्रेट समर सेल 2024 मध्ये 24,998 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर 1,000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर देखील उपलब्ध आहे, जी त्याची प्रभावी किंमत 23,998 वर आणेल. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, त्यावर 23,250 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M15 5G

हा सॅमसंग 5G फोन सेलमध्ये 11,999 रुपयांना उपलब्ध आहे पण तुम्ही तो 10,699 रुपयांना खरेदी करू शकता, फक्त यासाठी तुम्हाला फोनवर उपलब्ध असलेल्या 1300 रुपयांच्या कूपनचा लाभ घ्यावा लागेल. याशिवाय फोनवर 11,350 रुपयांचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe