टेक्नोलाॅजी

ATM Withdraw : भारीच .. आता एटीएम कार्डची गरज नाही ! ‘या’ पद्धतीचा वापर करून फोनद्वारे काढा पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

ATM Withdraw : आज मोबाईलच्या मदतीने घरी बसून तुम्ही एकाच वेळी अनेक काम करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो आज मोबाईलच्या मदतीने काही जण हजारो रुपयांचे घरी बसून व्यवहार करत आहे तर काही जण ऑनलाईन शिक्षण घेत आहे तर कोणी आपला व्यवसाय मोबाईलद्वारे करत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता फोनमध्ये असणाऱ्या UPI द्वारे कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकता.

इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) ही एक सुविधा आहे जी लोकांना कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू देते. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. UPI मधून पैसे काढण्यासाठी तुम्ही GooglePay, PhonePe, Paytm आणि इतर UPI अॅप्स वापरू शकता.

UPI वापरून ATM मधून पैसे कसे काढायचे

स्टेप 1: कोणत्याही एटीएम मशीनवर जा आणि स्क्रीनवर रोख पैसे काढण्यावर टॅप करा.

स्टेप 2: नंतर UPI पर्याय निवडा.

स्टेप 3: तुमच्या ATM स्क्रीनवर QR कोड दिसेल.

स्टेप 4: आता तुमच्या फोनवर UPI अॅप उघडा आणि ATM मशीनवर प्रदर्शित होणारा QR कोड स्कॅन करा.

स्टेप 5: नंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका. तुम्ही 5 हजारांपर्यंत रोख काढू शकता.

स्टेप 6: UPI पिन एंटर करा आणि पुढे जा वर टॅप करा.

स्टेप 7: यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमधून कॅश मिळेल

हे पण वाचा :- iPhone 13 Offers : डोळे झाकून करा आयफोन 13 खरेदी ! होणार तब्बल 30 हजारांची बचत ; फक्त करा ‘हे’ काम

Ahmednagarlive24 Office