Best Laptops : स्वस्तात लॅपटॉप खरेदी करायचाय? ‘या’ ब्रँडेड कंपन्यांचे नवीन लॅपटॉप्स मिळताहेत 30 हजारांपेक्षा स्वस्तात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Laptops : सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आता जर तुमचे बजेट 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही एक शानदार लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे.

सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये हे लॅपटॉप खरेदी करता येईल. यामुळे तुम्हाला स्वस्तात नवीन लॅपटॉप खरेदी करता येतील आणि तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकेल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

हे आहेत सर्वोत्तम लॅपटॉप

HP Chromebook x360 Intel Cerelon Quad Core N4020

आता तुम्हाला HP चा हा जबरदस्त लॅपटॉप Flipkart वरून एकूण 26% च्या सवलतीने खरेदी करता येईल. या डिस्काउंटनंतर हा लॅपटॉप तुम्हाला 22,990 रुपयांना खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्लिपकार्टवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा लाभ देण्यात येत आहे, ज्या अंतर्गत त्यांना एकूण 20,000 रुपयांची बचत करता येईल. परंतु त्यासाठी तुमचा जुना लॅपटॉप चांगल्या स्थितीत असावा. यात ४ जीबी रॅम मिळतअसून त्याचा टच स्क्रीन डिस्प्ले 14 इंचाचा आहे.

Infinix Y1 Plus Neo Intel Celeron Quad Core JSL N5100X

ग्राहक आता Infinix हा लॅपटॉप 23,990 रुपयांमध्ये सहज खरेदी करू शकतात. या लॅपटॉपमध्ये Intel Celeron Quad Core प्रोसेसर (11th Gen), 8 GB RAM दिली आहे आणि तो Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत या लॅपटॉपवर एकूण 20,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. हे लक्षात घ्या की ही सवलत तुमच्या जुन्या लॅपटॉपचे मॉडेल आणि स्थिती तसेच तुमच्या क्षेत्रातील एक्सचेंजची उपलब्धता यावर अवलंबून असणार आहे.

Asus Vivo 15 Core i3 11156G4

हा लॅपटॉप तुम्हाला एकूण 30% च्या सवलतीत खरेदी करता येईल. शानदार डिस्काउंटनंतर हा लॅपटॉप तुम्ही अवघ्या 34,990 रुपयांना घरी नेऊ शकता. इतकेच नाही तर हा लॅपटॉप एक्सचेंज ऑफर अंतर्गत 20,000 रुपयांच्या सवलतीत सहज खरेदी करता येईल. यामध्ये 8 जीबी रॅम, 64 बिट विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टम आणि 512 जीबी एसएसडी देण्यात आली आहे.