‘iPhone 13’च्या किमतीत मोठी कपात, Apple चा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त

iPhone 13 : Apple iPhone 13 फ्लिपकार्ट, Amazon वर नुकत्याच झालेल्या सणासुदीच्या सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला होता. आता तुम्हाला Apple कडून हा 5G फोन स्वस्तात घ्यायचा असेल, तर एक चांगली संधी आहे. आता तुम्ही Apple iPhone 13 कमी किंमतीत ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ऍपल स्टोअरवरून कमी किमतीत खरेदी करू शकता. Apple iPhone 13 वरील सवलतीबद्दल वाचा सविस्तर

फ्लिपकार्टवर iPhone 13 ची किंमत

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

128 GB स्टोरेजसह iPhone 13 चा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 66,990 रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरसह, तुम्हाला या iPhone वर 18,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय, फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर आहेत ज्याद्वारे तुम्हाला iPhone 13 अधिक स्वस्तात मिळेल. सुरक्षित पॅकेजिंगसाठी फ्लिपकार्ट 29 रुपये आकारत आहे.

ऍमेझॉनवर iPhone 13 ची किंमत

आयफोन 13 चा बेस व्हेरिएंट Amazon वर 66,990 रुपयांना लिस्ट झाला आहे. Amazon India वर एक्सचेंज ऑफरमध्ये हँडसेट घेण्याचीही संधी आहे. Flipkart प्रमाणे, Amazon वर निवडक बँकांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून देखील कॅशबॅक मिळू शकतो.

दुसरीकडे, Apple Store सारख्या इतर प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास, Apple iPhone 13, 69,990 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. तथापि, वापरकर्ते ऍपलच्या ट्रेड-इन प्रोग्राममध्ये रु. 2,200 ते रु. 58,730 पर्यंत सूट घेऊ शकतात. ही सूट तुमच्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असते.

गेल्या वर्षी आलेल्या iPhone 13 बद्दल बोलायचे झाले तर ते नवीनतम iPhone 14 सारखेच आहे. पण iPhone 14 मध्ये काही नवीन अपग्रेड्स नक्कीच केले गेले आहेत. iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हा iPhone A15 बायोनिक चिपसेटसह येतो.

हाच प्रोसेसर लेटेस्ट iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये देण्यात आला आहे. iPhone 13 मध्ये मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iPhone 13 हा 5G फोन आहे.

iPhone 13 (2)
iPhone 13 (2)