Samsung Galaxy : ट्रिपल कॅमेरा असलेला सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फोन स्वस्तात आणा घरी, इथे सुरु आहे ऑफर…

Content Team
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुमचे बजेट 20 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्ही या रेंजमध्ये सॅमसंगचे ब्रँडेड फोन खरेदी करू शकता. सॅमसंग ही अशी एकमेव कपंनी आहे. जी सर्व बजेट मध्ये फोन सादर करते. अशातच सॅमसंग फोनवर सतत ऑफर सुरु असतात. अशीच एक खास ऑफर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

सध्या शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर एकापेक्षा एक फोन स्वस्त दरात मिळत आहेत. यामध्ये Samsung Galaxy M15 5G चे देखील नाव आहे. हा फोन तुम्ही अगदी स्वस्त दरात खरेदी करून घरी आणू शकता. यामध्ये तुम्हाला एक मोठी बॅटरी आणि चांगला कॅमेरा देखील मिळत आहे. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर चला त्याच्या ऑफरबद्दल आणि फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया…

डिस्प्ले

या डिव्हाइसमध्ये 6.5 इंच फुल-एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. जे 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचने सुसज्ज आहे.

प्रोसेसर

मल्टीटास्किंगसाठी या डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 6100 चिपसेट आहे. जो 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे. जर तुम्हाला सेल्फी घेण्याचा शौक असेल तर तुम्हाला यात 13 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

बॅटरी

फोनला 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. जी 6,000mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येते.

त्याची किंमत आणि ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, 6GB RAM/ 128GB स्टोरेजची किंमत 16,999 रुपये आहे. जे Amazon वरून 15 टक्के डिस्काउंट नंतर 14,499 रुपयांना विकले जात आहे. त्याच वेळी, तुम्ही हा फोन बँक ऑफर अंतर्गत देखील खरेदी करू शकता जिथे HDFC बँकेवर 1000 ची सूट दिली जात आहे.

जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला 13,750 रुपयांची सूट मिळत आहे. पण हे मूल्य मिळवण्यासाठी तुम्हाला सर्व अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतील. याशिवाय तुम्हाला त्यावर EMI चा पर्यायही दिला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe