Budget Laptop : Infinix InBook X1 सिरीज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये, कंपनीने आपला नवीन लॅपटॉप InBook X1 स्लिम लॅपटॉप 35,999 रुपयांच्या किंमतीसह बाजारात आणला होता आणि आता कंपनीने आपला नवीन लॅपटॉप InBook X1 Neo 25 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा लॅपटॉप लॉन्च करण्यात आला आहे. भारतातील Infinix Inbook X1 Neo ची किंमत आणि या लॅपटॉपमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.
Infinix INBook X1 Neo ची भारतात किंमत
8 GB रॅम आणि 256 GB SSD स्टोरेज मॉडेल असलेल्या या Infinix लॅपटॉपची किंमत 24,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या लॅपटॉपची विक्री 21 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल आणि ग्राहक हे मॉडेल सिल्व्हर आणि ब्लू कलरमध्ये खरेदी करू शकतील.
वैशिष्ट्ये
या Infinix लॅपटॉपला 14-इंच फुल एचडी स्क्रीन मिळेल जी 300 nits पीक ब्राइटनेससह येईल. या डिवाइस मध्ये कंपनी ने इंटेल सेलेरियन N5100 क्वाड-कोर प्रोसेसर 8 GB रॅम आणि 256 GB NVMe PCle 3.0 SSD स्टोरेज सह दिला आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप अल्ट्रा-टिकाऊ अॅल्युमिनियम अलॉय मेटल बॉडीसह लॉन्च करण्यात आला आहे.
लॅपटॉपच्या पुढील भागात ड्युअल स्टारलाइट फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना Infinix ब्रँडच्या या नवीनतम लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि डीटीएस साउंड सिस्टम सारखी वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतील.
कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी टाइप-सी, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट, हेडफोन जॅक आणि एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा लॅपटॉप आहे जो 45W फास्ट चार्ज सपोर्ट देईल. या लॅपटॉपमध्ये 50Whr बॅटरी आहे, जी संपूर्ण दिवस टिकू शकते असे सांगण्यात आले आहे.