BSNL Prepaid Plan : स्वस्तात मस्त, BSNL ने सादर केला हा नवा प्रीपेड प्लान, वाचा सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Prepaid Plan : आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या कंपनींशी स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी BSNL आपले ननवीन प्लॅन सादर करत असते. ज्याचा फायदा वापरकर्त्यांना मिळतो. दरम्यान, कमी किमतीच्या योजना शोधणाऱ्या ग्राहकांसाठी BSNL ने आपला एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. जाणून घ्या या प्लॅनबद्दल.

दरम्यान, BSNL लवकरच आपली 4G सेवा सुरू करणार आहे आणि त्यानंतर तुम्ही 5G वरही लवकरच काम सुरू करू शकते. यासाठी सरकारने कंपनीसाठी 5G स्पेक्ट्रम सुरक्षित केले आहे. दरम्यान, कंपनीने 50 रुपयांपेक्षा कमी असणारा किफायतशीर हा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे.

या रिचार्जे मुळे मिळणारे फायदे

BSNL ने 48 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी एक खास पर्याय असू शकतो जे कमी किमतीमध्ये रिचार्ज करू इच्छित आहेत. दरम्यान, या प्लॅनमध्ये मेन बॅलेन्स हा 10 रुपये इतका आहे. तर याशिवाय, वापरकर्त्यांना 20 पैसे प्रति मिनिट दराने लोकल आणि एसटीडी कॉलिंगची परवानगी मिळेणार आहे. तर BSNL चा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

दरम्यान, हा प्लॅन फक्त फक्त कॅलिंगसाठी वापरता येणार असून, या प्लॅनमध्ये कोणताही डेटा किंवा संदेश मिळणार नाही. याशिवाय, या प्लॅनमध्ये कोणतीही इतर सेवा मिळणारनाही.

हा प्लॅन अशा लोकांसाठी योग्य आहे जे BSNL चे सिम सेकंड म्हणून वापरतात, तर आपले सिम चालू ठेवण्यासाठी आणि लोकल कॉल करण्यासाठी या सिमचा वापर केला जाणार असावा. यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरेल.