Cheapest Laptops In India : स्वस्तात मस्त बजेट लॅपटॉप! हे आहेत भारतातील फास्ट प्रोसेसर लॅपटॉप, किंमत ३० हजारांपेक्षा कमी

Ahmednagarlive24 office
Published:
Cheapest Laptops In India

Cheapest Laptops In India : भारतात दिवसेंदिवस स्मार्टफोनबरोबरच लॅपटॉपच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. दिवसेंदिवस लॅपटॉपच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना काळापासून लॅपटॉपचा वापर वाढला आहे. अनेक कामे घरबसल्या लॅपटॉपद्वारे केली जात आहेत.

बाजारात सध्या अनेक कंपन्यांचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. पण बाजारात असे काही लॅपटॉप आहेत जे तुमच्या बजेटमधील असू शकतात. तसेच त्यांचा बॅटरी पॅक आणि स्पेसिफिकेशन्स देखील मजबूत आहे.

भारतात असे ५ लॅपटॉप आहेत जे तुमच्या बजेटमध्ये असू शकतात. या लॅपटॉपची किंमत देखील ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच घरबसल्या तुम्हाला हे लॅपटॉप काम करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

HP Chromebook 15.6

तुम्हीही HP कंपनीचा लॅपटॉप शोधत असाल तर तुमच्यासाठी HP Chromebook 15.6 हा लॅपटॉप सर्वोत्तम पर्याय आहे. विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप चांगला पर्याय आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Celeron N4500 प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपची किंमत 28,999 रुपये आहे.

Asus Vivobook Go 15

तुम्हीही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय आणि बजेट कमी आहे तर तुम्ही देखील Asus Vivobook Go 15 हा लॅपटॉप अगदी 27,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसर या लॅपटॉपमध्ये देण्यात येत आहे. लॅपटॉपमध्ये 8 GB रॅम आणि 512 GB SSD साठी सपोर्ट आहे.

Infinix X1 स्लिम XL21

Infinix X1 स्लिम XL21 हा लॅपटॉप तुम्ही तुमच्या बजेटमधील किमतीमध्ये खरेदी करू शकता. Infinix च्या या लॅपटॉपची किंमत 29,990 रुपये आहे. लॅपटॉपमध्ये 14-इंच फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आले आहे. Intel Core i3 10th Gen प्रोसेसर आणि 8 GB LPDDR4X रॅमसह 256 GB SSD स्टोरेज या लॅपटॉपमध्ये देण्यात आले आहे.

Acer One 14

तुमच्यासाठी Acer’s One 14 हा कमी बजेटमधील लॅपटॉप सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. लॅपटॉपमध्ये 14-इंच एचडी प्लस स्क्रीन आणि AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर देण्यात येत आहे. या लॅपटॉपची किंमत 29,990 रुपये आहे. या लॅपटॉपला Windows 11 आणि 8 GB LPDDR4X रॅम मिळतो.

रेडमी बुक 15

Redmi Book 15 या लॅपटॉपची भारतातील किंमत 31,990 रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंच फुल एचडी प्लस स्क्रीनसह Intel Core I3 11th Gen प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच लॅपटॉपमध्ये 8 GB LPDDR4X रॅमसह 256 GB SSD स्टोरेज मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe