सध्या प्रचंड प्रमाणात उष्णता असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये मोठ्या प्रमाणात फॅन, कुलर आणि एअर कंडिशनर म्हणजेच एसीचा वापर वाढल्याचे चित्र असून यामुळे नक्कीच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वीजबिलात देखील प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
तिन्ही विद्युत उपकरणांपैकी एसीसाठी जास्त विजेचा वापर होतो व प्रचंड प्रमाणात वाढीव वीज बिलाच्या रूपात नागरिकांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे एसीच्या माध्यमातून येणारे वीजबिल कमी करता येईल का किंवा अशा काही प्रभावी पद्धती आहेत का तिच्या वापरल्यामुळे एसी च्या माध्यमातून येणारे वीजबिल कमी होऊ शकेल किंवा एसीच्या माध्यमातून विजेचा वापर कमी केला जाईल.
अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. जेव्हा आपण एसी वापरतो तेव्हा काही चुका करत असतो यामुळे वीजबिलात मोठी वाढ होते. याकरिता तुम्ही देखील जर एसीच्या वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून शेअर केल्या गेलेल्या टिप्स फायद्याचे ठरू शकतात.
ऊर्जा मंत्रालयाने सांगितल्या खास टिप्स
ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून एसीचा वापर कसा करावा याबाबत महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच योग्य पद्धतीने एसीचा वापर कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने केला गेला पाहिजे याची महत्त्वाची माहिती ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे.
माहितीनुसार बघितले तर एसीचा वापर योग्य रीतीने केला तर आपण वीज बिलापासूनच नाहीतर काही होणाऱ्या आजारापासून देखील स्वतःला वाचवू शकतो आणि त्यासोबत पर्यावरणाचे रक्षण देखील करू शकतो. ऊर्जा मंत्रालयातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीचे सरासरी तापमान नेहमी 26 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
घरामध्ये जेव्हा एसी सुरू असतो तेव्हा सिलिंग फॅनचा देखील वापर करणे महत्त्वाचे ठरते. याबाबत दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर वातावरणातील उष्णता जास्त वाढल्यामुळे अनेक लोक जास्त काळ एसीचा वापर करतात व तापमान 20 ते 22 डिग्री वर ठेवतात. यामुळे विजेचा वापर जास्त होतो आणि एसीचा सतत वापर केल्यामुळे अनेक आजार देखील उद्भवतात.
कारण मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते व मानवी शरीर 23 ते 39 अंश सेल्सिअस तापमान सहन करते. परंतु एसीचे तापमान जर 19 ते 20 किंवा 21°c ठेवले तर हे तापमान शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा फार कमी होते व त्यामुळे हायपोथरमिया होऊ शकतो.
रक्त प्रवाह शरीरामध्ये सुरळीत राहत नाही व रक्तप्रवाह मध्ये दीर्घकाळ अडथळे येऊन इतर आजार होऊ शकतात. तसेच एसीच्या हवेमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा शरीराला घाम येत नसल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत त्यामुळे देखील काही आजार होऊ शकतात. त्यामुळे एसी वापरताना त्याचे सरासरी तापमान नेहमी 26 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे व त्यासोबत रूम मधील सिलिंग फॅन देखील सुरू ठेवणे गरजेचे आहे.