Fan Festival Sale : तुम्ही देखील आता नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला या लेखात एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी 17,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह Xiaomi आणि Redmi चे स्मार्ट टीव्ही सहज खरेदी करू शकतात.
लोकप्रिय कंपनी Xiaomi ने ग्राहकांसाठी ही सूट जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही Xiaomi च्या वेबसाइटवर सुरू असलेल्या Fan Festival Sale मध्ये या ऑफरचा फायदा घेत स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या हा सेल 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
या टीव्हीची MRP 44,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही ते 32,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला ICICI नेटबँकिंगद्वारे पेमेंटवर रु. 2,000 आणि ICICI क्रेडिट कार्डवर रु. 1,000 ची झटपट सूट मिळेल.
Xiaomi चा हा टीव्ही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत जबरदस्त आहे. यामध्ये कंपनी 50-इंचाचा 4K डॉल्बी व्हिजन डिस्प्ले देत आहे. टीव्हीमध्ये, कंपनी डॉल्बी ऑडिओसह 30W स्पीकर सिस्टम देत आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर या 55-इंचाच्या टीव्हीची MRP 54,999 रुपये आहे. फॅन फेस्टिव्हलमध्ये, तुम्ही ते रु.37,999 मध्ये डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला रु. 1,000 ची झटपट सूट मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही ICICI नेटबँकिंगद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट देखील मिळू शकते.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या 4K टीव्हीमध्ये 55-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. पावरफुल साऊंडसाठी, तुम्हाला या टीव्हीमध्ये 30-वॉट स्पीकर सिस्टम मिळेल.
घरामध्ये थिएटरसारखा अनुभव देण्यासाठी, कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी साउंडसह DTS Virtual:X देखील देत आहे. Redmi चा हा टीव्ही 2 GB रॅम आणि 16 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला यात 64-बिट क्वाड-कोर A55 चिपसेट मिळेल.
हे पण वाचा :- Saturn Planet Gochar In Kumbh: 10 एप्रिलपासून चमकणार ‘या’ 3 राशींचे नशीब ; होणार मोठा फायदा