टेक्नोलाॅजी

Fastrack Revoltt FS1 : अवघ्या 1299 रुपयात फास्ट्रॅकचे नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी मिळतोय लाभ

Published by
Ahmednagarlive24 Office

Fastrack Revoltt FS1 : अलीकडच्या काळामध्ये स्मार्टवॉच वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जास्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे कंपन्या ग्राहकांचा कल लक्षात घेता नवनवीन स्मार्टवॉच लाँच करत असतात.

नुकतेच फास्ट्रॅकने आपले नवीन स्मार्टवॉच Fastrack Revoltt FS1 लाँच केले आहे. ज्याची मूळ किंमत 3,995 रुपये आहे. परंतु तुम्ही ते सवलतीनंतर 1,299 रुपयांना सहज खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी भन्नाट संधी जाणून घ्या.

तुम्हाला आता फ्लिपकार्टवर मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत Fastrack स्मार्टवॉच खरेदी करता येत आहे. या ठिकाणी सर्वात जास्त विक्री होणाऱ्या Fastrack मॉडेलवर 60% पेक्षा जास्त सवलत देण्यात आली आहे. हे मॉडेल लॉन्च झाल्यापासून तुम्ही ते आतापर्यंतच्या खूप स्वस्तात खरेदी करू शकता. तसेच तुम्ही ते खरेदी करत असताना तुम्हाला बँक ऑफरचाही लाभ घेता येत आहे.

Fastrack Revoltt FS1 किंमत 

जर Fastrack Revoltt FS1 च्या किमतीबाबत विचार केला तर या स्मार्टवॉचची भारतीय बाजारपेठेत किंमत 3,995 रुपये इतकी आहे परंतु आता तुम्ही Flipkart अॅपवर 67% सवलतीनंतर 1,299 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅकचा लाभ वेगळा मिळेल. हे स्मार्टवॉच तुम्ही ब्लॅक, ब्लू, क्रीम, ग्रीन, डीप वाईन आणि टील कलर पर्यायांत खरेदी करू शकता.

जाणून घ्या Fastrack Revoltt FS1 ची फीचर्स

आनंदाची बाब म्हणजे की प्रीमियम डिझाइन असो किंवा प्रगत फीचर्स, हे स्मार्टवॉच कुठेही कमी नाही. यामध्ये 2.5D वक्र ग्लास आणि 500nits पीक ब्राइटनेससह 1.83-इंचाचा अल्ट्राव्हीयू डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 240×284 पिक्सेल रिझोल्युशनसह येत आहे. हे स्मार्टवॉच प्रगत चिपसेटसह येतो, यामध्ये कंपनीने सिंगलसिंक बीटी कॉलिंग सपोर्ट दिला असून एआय व्हॉईस असिस्टंट देखील उपलब्ध आहे.

NitroFast टेकसह, यामध्ये तुम्हाला 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 10 मिनिटांच्या चार्जिंगसह पूर्ण दिवस ते चालू शकते. हे 110 स्पोर्ट्स मोड आणि 200 पेक्षा जास्त वॉच फेसला सपोर्ट करत असून यात हार्ट रेट मॉनिटरिंग शिवाय ऑटो स्लीप ट्रॅकर, SpO2 मॉनिटर आणि स्ट्रेस मॉनिटर तुम्हाला पाहायला मिळेल. क्विक रिप्लाय, स्मार्ट नोटिफिकेशन्स आणि स्मार्ट कंट्रोल्स यासारखे अनेक फीचर्स आयपी68 रेटिंगसह वॉचमध्ये कंपनीने दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office