ChatGPT Chatboats : OpenAI, ChatGPT AI याद्वारे नवी घोषणा करण्यात आली असून, ChatGPT च्या वापरकर्त्यांना आता लवकरच त्यांचे स्वतःचे ChatGPT चॅटबॉट्स तयार करता येणार आहे. दरम्यान, यासाठी GPT-4 मॉडेलवर आधारित स्वतःचा चॅटबॉट तयार करण्याची परवानगी दिली गेली आहे.
दरम्यान, एसइओ टूल डेव्हलपरद्वारे या संदर्भातील एक विडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये या नवीन फिचर बद्दल दाखवण्यात आले असून, युजर्स लवकरच त्यांचा चॅटबॉट तयार करतील असे दाखविण्यात आले आहे.
दरम्यान, यासाठी चॅटबॉट क्रिएटरमध्ये “क्रिएट” नावाचा वेगळा टॅब दिसेल. या टॅबमध्ये वापरकर्त्याला डिफॉल्ट भाषा, लेखन पद्धती असे अनेक पर्याय दिले जातील. “कॉन्फिगर” टॅब वापरकर्त्यांना त्यांच्या बॉटला नाव देण्यास अनुमती देईल. याशिवाय वापरकर्ते त्यांना बॉटने कोणते काम करायचे आहे हे देखील सेट करू शकतील.
वापरकर्ते चॅटबॉटमध्ये कस्टम प्रॉम्प्ट देखील टाकू शकतील. आपण वेब ब्राउझिंग आणि प्रोफाइल तयार करण्यासाठी फाईल अपलोड करू शकतात. मात्र हे फिचर फक्त सबस्क्रिप्शन घेणाऱ्याला मिळणार आहे.
OpenAI नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनवर काम करत आहे
चॅटबॉट निर्मात्या व्यतिरिक्त, ओपनएआय “टीम” नावाची एंटरप्राइझ सबस्क्रिप्शन योजना सुरू करण्याची योजना आखत आहे. टीम प्लॅनमध्ये स्वस्त, वार्षिक पर्याय असतील आणि हाय-स्पीड GPT-4 आणि चारपट कन्टेन्ट असेल. दरम्यान, यामध्ये तीन युजर्स असणार असून, या प्लॅनची किंमत प्रति वापरकर्ता प्रति महिना $25 असेल. तर याशिवाय, याच्या वर्षभराच्या प्लॅनसाठी $30 प्रति महिना उपलब्ध असेल.