Fire-Boltt Gladiator Plus : स्टायलिश डिझाइन आणि जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाले फायर बोल्टचे स्मार्टवॉच, एकाच चार्जवर चालेल 20 दिवस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fire-Boltt Gladiator Plus : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नुकतेच फायर बोल्टने आपले आणखी एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. जे तुम्हाला स्टायलिश डिझाइन आणि जबरदस्त फीचर्ससह खरेदी करता येईल.

विशेष म्हणजे हे स्मार्टवॉच एकदा फुल चार्ज केले तर ते 20 दिवस चालते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच कंपनीने नायलॉन,ओशन स्ट्रॅप, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉन स्ट्रॅप प्रकारांत लाँच केले आहे.

कंपनीकडून नवीन स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि महिला आरोग्य मॉनिटर यांसारखे स्मार्ट हेल्थ सेन्सर देण्यात आले आहेत. हे 115 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडचे समर्थन करत असून ते IP67-रेटिंगसह येते.

जाणून घ्या किंमत

किमतीचा विचार केला तर फायर-बोल्ट ग्लॅडिएटर प्लस स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये इतकी आहे. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असेल तर तुम्हाला ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. हे चार वेगवेगळ्या नायलॉन,ओशन स्ट्रॅप, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉन स्ट्रॅप प्रकारांमध्ये येत आहे.

नायलॉन स्ट्रॅप ऑरेंज, ग्रीन आणि सेल कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. तर ओशन स्ट्रॅप ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करता येत आहे. स्टेनलेस स्टील स्ट्रॅप काळ्या, गुलाबी, गडद राखाडी आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे आणि सिलिकॉन स्ट्रॅप काळ्या रंगाच्या पर्यायांत उपलब्ध आहे.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

फायर-बोल्टचे नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.96-इंच (410×502 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले 600 nits पीक ब्राइटनेस आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. घड्याळ ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना थेट स्मार्टवॉचवरून फोन कॉल करता येतो. स्मार्टवॉच गूगल असिस्टंट आणि सिरी सारख्या AI व्हॉईस असिस्टंटना सपोर्ट करते.

फीचर्स

कंपनीच्या मतानुसार, फायर-बोल्ट ग्लॅडिएटर प्लस सामान्य वापरासह सात दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ, ब्लूटूथ कॉलिंगसह दोन दिवसांपर्यंत आणि स्टँडबाय मोडमध्ये 20 दिवसांपर्यंत ऑफर करते.

या स्मार्टवॉचमध्ये अंगभूत गेम्स, रिमोट कॅमेरा कंट्रोल, स्टॉपवॉच, अलार्म, टायमर आणि हवामानाचा अंदाज अशी अनेक फीचर्स दिली आहेत. तसेच, नवीन फायर बोल्ट स्मार्टवॉच स्मार्ट सूचना आणि नेहमी-चालू डिस्प्लेला समर्थन देतो.