Flipkart iphone Sale : बंपर सूट ! iPhone 15 खरेदीवर फ्लिपकार्ट देतेय हजारोंची मोठी सूट, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipkart iphone Sale : भारतीय मार्केटमध्ये Apple स्मार्टफोन कंपनीने अनेक महागडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. अनेकांचे iPhone खरेदी करण्याचे स्वप्न असते मात्र या स्मार्टफोनच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाही.

मात्र आता तुमचे iPhone खरेदी करण्याचे स्वप्न आता कमी बजेटमध्ये पूर्ण होईल. Flipkart या ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवर iPhone 15 स्मार्टफोनवर बंपर सूट देत आहे. त्यामुळे तुम्ही देखील त्वरित हा स्मार्टफोन खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

Flipkart वर लागलेल्या सेलवरून तुम्ही iPhone 15 स्मार्टफोन फक्त 66,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सप्टेंबर 2023 मध्ये iPhone 15 लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. या स्मार्टफोनवर 13 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

Flipkart कडून iPhone 15 स्मार्टफोन स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही आणखी आर्थिक बचत करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन आर्थिक फायदा मिळवू शकता.

Flipkart वर iPhone 15 वर ऑफर

फ्लिपकार्टकडून देण्यात असलेल्या ऑफरमध्ये iPhone 15 वर तुम्ही 13,000 बचत करू शकता. 128GB iPhone 15 ची मूळ किंमत 79,900 रुपये आहे जो तुम्ही फ्लिपकार्टवर अवघ्या 66,999 मध्ये खरेदी करू शकता.

256GB iPhone 15 ची फ्लिपकार्टवर किंमत 76,999 रुपये आहे. 512GB iPhone 15 ची फ्लिपकार्टवर किंमत 96,999 रुपये आहे. फ्लिपकार्टवरून जर तुम्ही iPhone 15 खरेदी करताना बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची बचत करू शकता. तसेच iPhone 15 वर फ्लिपकार्टवर EMI पर्याय देखील दिला जात आहे.

आयफोन 15 वैशिष्ट्ये

Apple स्मार्टफोन कंपनीकडून त्यांच्या iPhone 15 फोनमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. iPhone 15 मध्ये A16 Bionic चिप वेगवान प्रोसेसर देण्यात आला आहे.