Flipkart Offer : जर तुम्हीही नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर एक उत्तम संधी दिली जात आहे. कारण Samsung Galaxy F23 5G फ्लिपकार्टवरून चांगल्या डीलवर घरी आणता येईल.
Galaxy F23 5G स्मार्टफोनची वैशिष्ठे
या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट, 5G कनेक्टिव्हिटी यांसारखी खास वैशिष्ट्ये आहेत. हा फ्लिपकार्ट डील स्टँडर्ड 4GB RAM आणि 128GB मेमरी व्हेरियंटवर नाही तर त्याच्या 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटवर आहे. याचा अर्थ तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत अधिक मेमरी, 5G कनेक्टिव्हिटी आणि प्रीमियम वैशिष्ट्ये मिळू शकतात.
फ्लिपकार्ट फोनवर 30 टक्के सवलत देत आहे, त्यानंतर फोनची किंमत रु. 22,999 च्या मूळ किंमतीवरून 15,999 रुपयांपर्यंत खाली येते. ही ऑफर कॉपर ब्लश कलर व्हेरियंटवर उपलब्ध आहे.
याशिवाय, SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर तुम्हाला 1,000 रुपयांची सूट मिळू शकते. SBI क्रेडिट कार्ड ऑफरच्या मदतीने त्याची किंमत 14,999 रुपये होते. तर Flipkart Axis Bank कार्डधारकांना 5 टक्के सूट मिळू शकते.
एक्सचेंज डीलमधून Samsung Galaxy F23 आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. याद्वारे तुम्हाला प्रचंड सूट मिळू शकते. एक्सचेंज डीलद्वारे सॅमसंग एफ-सीरीज स्मार्टफोन्सवर 15200 रुपयांची सूट मिळेल.
Samsung Galaxy F23 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह 6.6-इंचाचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-यू डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर चालतो.
Samsung Galaxy F23 5G फोनमध्ये कॅमेरा म्हणून ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल Samsung ISOCELL JN1 प्राथमिक सेन्सर आहे. यासोबतच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देखील समाविष्ट आहे.