Flipkart Sale : मोठ्या सवलतीसह घरी आणा LG चा “हा” स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Flipkart Sale : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या नेहमीच काही वस्तू सवलतीत ऑफर करतात. या काळात ग्राहक देखील त्या वस्तू खरेदी करण्यात रस दाखवतना दिसतात, तसेच या वस्तूंची विक्रमी विक्री देखील होताना दिसते, अशातच ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स घेऊन आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या ऑफर्समध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक उत्पादनांच्या खरेदीवर बचत करण्याची विशेष संधी देत आहे. अशातच जर तुम्ही लवकरच नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही संधी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. फ्लिपकार्टवर या 32-इंचाच्या LG TV वर उपलब्ध असलेल्या ऑफरवर एक नजर टाकूया.

या ऑफर दरम्यान, तुम्हाला LG चा HD रेडी LED स्मार्ट वेबओएस टीव्ही 13,990 रुपयांत मिळत आहे. यासोबतच कंपनीने इतरही अनेक ऑफर्स दिल्या आहेत. जर तुम्हाला टीव्ही पाहण्याची आवड असेल आणि कमी बजेटमध्ये उत्तम टीव्ही शोधत असाल, तर फ्लिपकार्टच्या या डीलमध्ये तुम्हाला 21,990 रुपयांच्या किमतीत 36 टक्के सवलतीसह एक उत्तम स्मार्ट टीव्ही मिळेल.

याव्यतिरिक्त, तुम्ही Axis बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक देखील मिळवू शकता. याशिवाय हा टीव्ही खरेदी करून तुम्ही फ्लिपकार्ट फर्निचरवर 500 रुपयांची सूट देखील मिळवू शकता.

त्याच वेळी, जर तुम्हाला एकाच वेळी पूर्ण पेमेंट करायचे नसेल, तर तुम्हाला या टीव्हीचे पैसे देण्यासाठी EMI चा पर्याय देखील मिळत आहे. हा टीव्ही तुम्ही दरमहा 485 च्या EMI वर खरेदी करू शकता. कंपनी या LG TV वर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.