Samsung Galaxy : तयार रहा! ‘या’ तारखेपासून सुरु होत आहे फ्लिपकार्ट सेल, सॅमसंगच्या फोन्सवर मिळणार प्रचंड सूट…

Content Team
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : शॉपिंग वेबसाईट Flipkart ने नुकतीच आगामी सेलची घोषणा केली आहे, ज्याचे नाव Flipkart BIG Saving Days आहे. हा सेल 3 मे पासून सुरू होईल आणि 9 मे पर्यंत चालेल. या सेल दरम्यान, तुम्ही बँक ऑफर आणि अनेक चांगल्या सवलतींचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये सॅमसंगच्या काही फोनवर मोठा डिस्काउंट मिळाला आहे. जर तुमचा सध्या मोबाईल फोन घेण्याचा विचार असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये सॅमसंगचे काही मोबाईल सवलतीत उपलब्ध असतील. फ्लिपकार्टवर आगामी सेलसाठी मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. त्यात काही सवलती, ऑफर्स आणि बँक ऑफर्स आदींची माहिती मिळाली आहे. तसेच, Samsung च्या Galaxy S23 आणि Galaxy S23 FE स्मार्टफोन्सवर देखील मोठी सूट मिळेल.

Galaxy S23 Flipkart वर 44,999 रुपयांपेक्षा कमी आणि Galaxy S23 FE 39,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. सॅमसंगचे हे फोन फोन IP68 रेटिंग, वायरलेस चार्जिंग आणि मेटल ग्लास यासारख्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह येतात. फ्लिपकार्टच्या या किंमतीमध्ये सर्व बँक ऑफर आणि सवलतींचा देखील समावेश आहे.

Samsung Galaxy S23 वर्ष 2023 मध्ये लॉन्च झाला होता आणि त्यावेळी त्याची सुरुवातीची किंमत 74,999 रुपये होती आणि Galaxy S23 FE गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता आणि त्याची किंमत 49,999 रुपये आहे. सॅमसंगने अलीकडेच दोन्ही हँडसेटसाठी OneUI 6.1 चे अपडेट रोलआउट जारी केले होते, ज्याच्या मदतीने या फोनला Galaxy AI आणि Google Circle Search इत्यादी देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 FE ची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 FE चे डिझाईन अगदी सारखे आहे, पण हार्डवेअरच्या बाबतीत दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. Samsung Galaxy S23 मध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट वापरण्यात आला आहे. तर, Samsung Galaxy S23 FE मध्ये Exynos 2200 चिपसेट वापरला गेला आहे. Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंच स्क्रीन आहे, तर S23 FE मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेटसह येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe