Flipkart Sale: काय सांगता! फ्लिपकार्टवर Redmi चा 10 हजारांचा स्मार्टफोन मिळत आहे 750 रुपयांना…

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल सुरू आहे. सेलमध्ये स्मार्टफोन्सवर चांगल्या ऑफर्स आहेत. काही स्मार्टफोन्सना इतके चांगले डील मिळत आहेत की असे वाटते की फ्लिपकार्टची काही तरी चूक आहे आणि ते महागडे फोन खूप स्वस्तात विकत आहेत. Redmi चा 10 हजार रुपयांचा फोन 749 रुपयांना खरेदी करता येईल. एवढी कमी किंमत पाहून लोकांनाही आश्चर्य वाटत आहे. मॉडेलचे नाव Redmi 9i Sport असे आहे. लोक खरेदीसाठी तुटून पडले आहेत. चला जाणून घेऊया Redmi 9i Sport वर ऑफर्स आणि डिस्काउंट…

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Redmi 9i स्पोर्ट ऑफर्स आणि सूट

Advertisement

Redmi 9i Sport ची लॉन्चिंग किंमत 9,999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवर हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, एक्सचेंज आणि बँक ऑफर देखील आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.

Redmi 9i स्पोर्ट एक्सचेंज ऑफर

Advertisement

Redmi 9i Sport वर 8,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळू शकते. परंतु तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच 8,250 रुपयांची एक्सचेंज ऑफ मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात तर फोनची किंमत 749 रुपये असेल.

Redmi 9i स्पोर्ट बँक ऑफर

Advertisement

जर तुम्हाला Redmi 9i Sport खरेदी करण्यासाठी जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल तर बँक ऑफर देखील आहे. तुम्ही कोणतेही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 700 रुपयांची सूट मिळेल आणि तुम्ही अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 415 रुपयांची सूट मिळेल. यानंतर फोनची किंमत 7,884 रुपये होईल.