Reliance Jio Cheapest Plan : टेलिकॉम कंपनी जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक प्लॅन ऑफर करत असते, आज आपण अशाच एका प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला OTT सब्सक्रिप्शनसह अनेक फायदे मिळतील. हा प्लॅन तुम्हाला फक्त एकदाच खरेदी करायचा आहे आणि वर्षभर तुम्हाला याचा लाभ मिळेल.
जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त आणि परवडणारे प्लॅन देत असते, म्हणूनच लोकांना या कंपनीचे रिचार्ज प्लॅन अधिक आवडतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.
आम्ही तुम्हाला ज्या रिलायन्स जिओच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, त्यामध्ये तुमच्या अनेक गरजा एकाच वेळी पूर्ण केल्या जाऊ शकतात. Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि मनोरंजनासाठी OTT चे फायदे देखील मिळतात. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही.
Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही बोलत आहोत जो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच तुम्हाला वर्षातून एकदाच रिचार्ज करावे लागेल. तसेच, तुम्हाला संपूर्ण वर्षभर सर्व नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. पण हा प्लान खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2,999 रुपये किंमत मोजावी लागेल.
याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी 912.5GB चा एकूण डेटा मिळतो. म्हणजेच तुम्ही दररोज 2.5GB डेटा वापरू शकता. तसेच यात तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मोफत मिळतात.
इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. यासोबत तुम्हाला Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.