Flipkart Big Bachat Days Sale : ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर 7 एप्रिलपर्यंत बिग बचत डेज सेल आहे. या सेलने सध्या खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये अनेक प्रोडक्ट आणि गॅजेट्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. या ऑफर्सद्वारे तुम्ही कोणतीही वस्तू अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.
अशातच जर तुम्ही Apple iPhone खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही डील तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. होय, कारण फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला मोठ्या सवलती आणि परवडणाऱ्या EMI वर iPhone 14 खरेदी करायला मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे वाचवू शकता.
ऑफर
iPhone 14 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 69,900 रुपये आहे आणि तुम्ही ते डिस्काउंटनंतर 58,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI वर 2,500 रुपयांची सूट मिळू शकते.
जर तुम्हाला 12 महिन्यांसाठी EMI मिळत असेल तर तुम्हाला फक्त 2075 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही फायदा मिळू शकतो. या ऑफर्स अंतर्गत तुम्ही हा हँडसेट अगदी कमी किमतीत खरेदी करून घरी आणू शकता.
iPhone 14 ची वैशिष्ट्ये
-iPhone 14 मध्ये तुम्हाला 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल.
-यासह, हे A15 बायोनिक चिपसेटसह उपलब्ध आहे.
-याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2532×1170 आहे.
-यामध्ये तुम्हाला 12MP ड्युअल कॅमेरे मिळतात.
-यामध्ये ग्राहकांना 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट मिळतात.
-तसेच हे सिरेमिक शील्डच्या सुरक्षिततेसह येते.
-पॉवरसाठी, या उपकरणाची बॅटरी 3279mAh आहे. जो 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होतो.