BSNL Offer : मिळवा BSNL चे मोफत 4G सिम, डेटाही मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर.. 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Offer : BSNL च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असून, BSNL च्या ग्राहकांना मोफत 4G सिम अपग्रेड दिले जाणार आहे. दरम्यान, लवकरच कंपनी 4G सेवा सुरू करण्याच्या तयारीमध्ये असून, पुढील वर्षी जूनपर्यंत ही सेवा संपूर्ण देशात दिली जाणार आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल. 

बीएसएनएलचे अध्यक्ष पीके पुरवार यांनी ही कंपनी डिसेंबरमध्ये 4G सेवा सुरू करेल आणि जूनपर्यंत या सेवा संपूर्ण देशात विस्तारित करेल अशी माहिती दिली होती. दरम्यान, यानंतर कंपनीचे 5G नेटवर्क अपग्रेड कारण्यावरती भर दिला जाईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, कंपनीच्या आंध्र प्रदेश युनिटने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी BSNL च्या यूजर्सना त्यांचे जुने 2G किंवा 3G सिम विनामूल्य 4G वर अपग्रेड करता येणार आहे. सोबतच या पोस्टसोबत शेअर केलेल्या इमेजमध्ये तीन महिन्यांसाठी मोफत 4G डेटाही दिला जाणार आहे. मात्र यासाठी कंपनीच्या वापरकर्त्यांना बीएसएनएलच्या ग्राहक सेवा केंद्र, फ्रँचायझी किंवा रिटेलर स्टोअरला भेट द्यावी लागेल.

केंद्र सरकारने बीएसएनएलला 4G आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी 89,000 कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. या संदर्भात मंत्रिमंडळाने जारी केलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, “या पॅकेजमुळे, बीएसएनएल एक उत्तम दूरसंचार सेवा प्रदाता म्हणून पुढे जाण्यात मदत होईल. आणि देशातील दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यावर ते लक्ष केंद्रित करतील.”

गेल्या आर्थिक वर्षात बीएसएनएलचा तोटा 8,161 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर मागील आर्थिक वर्षात ते 6,982 कोटी रुपये होते.मात्र हा तोटा मागे टाकत BSNL पुन्हा नव्याने आपली सुरुवात करणार आहे.

गेल्या वर्षी देशात 5G सेवा सुरू झाली. खाजगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या 5G नेटवर्कची व्याप्ती झपाट्याने वाढवली आहे. बीएसएनएलला खासगी टेलिकॉम कंपन्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. मात्र लवकरच कंपनी नव्याने सुरुवात करून देशात 5G सेवा सुरु करण्यावर भर देणार आहे.