Gmail Alert : गुगलचे जीमेल सेवा ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी आहे. मात्र या जीमेल युजर्ससाठी एक मोठी बातमी असून, कंपनी पुढील महिन्यात लाखो जीमेल अकाउंट बंद करू शकते. एका विशेष प्रोसेसद्वारे गुगलने लाखो जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या तुमचे अकाउंट या लिस्ट मध्ये तर येत नाही ना.
गुगलने लाखो जीमेल अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला असून, गुगलच्या धोरणानुसार, जी खाती 2 वर्षांपासून वापरली गेली नाहीत. ती खाती हटवली जाणार आहेत. दरम्यान, जर Gmail खाते डिलीट केले तर, यासोबतच तुम्ही Google Doc, आणि Photos मध्ये प्रवेश करू शकणार नाही.
दरम्यान, खूप दिवसांपासून बंद असणाऱ्या खात्यानं इनएक्टिव अकाउंट असे म्हंटले जाते. तुम्ही तुमच्या Google खात्यात बराच काळ लॉग इन केले नसल्यास, तुमचे खाते बंद होऊ शकते. तुम्ही सतत जीमेल वापरत असाल, म्हणजेच तुम्ही जीमेलचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. अशा व्यक्तीचे जीमेल खाते हटवले जाणार नाही.
तुमचे Google खाते डिलीट होऊ नये असे तुम्हालाही वाटत असेल, तर लगेच तुमच्या खात्यात लॉग इन करा. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास, तो रीसेट करा. याशिवाय सुरक्षा तपासा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा. गुगलच्या या निर्णयामुळे शाळा, संस्था आणि व्यवसाय खात्यावर नाही तर केवळ वैयक्तिक Google खात्यांवर परिणाम होणार आहे.
दरम्यान, हे खाते खाते हटवण्यापूर्वी, Google अशा वापरकर्त्यांना अनेक सूचना पाठवत आहे आणि आपले अकाउंट सुरु ठेवण्यासाठी विचारत आहे. दरम्यान, जर तुम्ही सुद्धा तुमचे जीमेल अकाउंट वापरात नसेल तर लवक्रातील कव्हर ते लॉगिन करून सुरु ठेवा. अन्यथा तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.