टेक्नोलाॅजी

आयफोन घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! iPhone 15 चक्क 16 हजार रुपयांनी स्वस्त, एवढे पैसे भरा अन घरी आणा नवाकोरा फोन

Published by
Ahmednagarlive24 Office

iPhone Price Down : अँपल ही अमेरिकन कंपनी भारतात खूपच लोकप्रिय आहे. अँपलचे आयफोन घेण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. मात्र आयफोनची किंमत पाहता अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र आता आयफोन घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे आयफोन चे लेटेस्ट मॉडेल आता स्वस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 15 आता ग्राहकांना स्वस्तात मिळणार आहे.

खरे तर अनेकांना आयफोन फिफ्टीन खरेदी करायचा आहे, परंतु त्यांच्याकडे एवढे बजेट नसल्याने हा फोन त्यांना खरेदी करता येत नाहीये. आता मात्र आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की, आता आयफोन आता 65 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

यामुळे जर फक्त पैशांमुळे तुमचे आयफोन 15 खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले असेल तर तुम्हाला आता कमी पैशात हा फोन खरेदी करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान, आता आपण iPhone 15 आता 65 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत कसा खरेदी करता येऊ शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आयफोन 15 किती हजारांनी स्वस्त मिळणार?

मीडिया रिपोर्टनुसार सध्या फ्लिपकार्टवर 26 जानेवारी निमित्त अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन सेल सुरू आहे. यामुळे मोबाईल, टीव्ही यांसारख्या अनेक वस्तू आता ग्राहकांना स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. यामध्ये 128 GB वेरियंटचा आयफोन 15 हा जवळपास 80 हजार रुपयाचा फोन 65000 रुपयात खरेदी करता येणार आहे. आयफोनच्या या मॉडेलची किंमत 79 हजार 900 रुपये एवढी आहे, मात्र सेलमध्ये हा आयफोन फक्त आणि फक्त 65 हजार 999 रुपयांना उपलब्ध होत आहे.

म्हणजेच हा फोन मूळ किमतीपेक्षा 11,901 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. याशिवाय ग्राहकांना आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास अधिकची सूट मिळू शकणार आहे. जर ग्राहकांनी सर्व ऑफरचा लाभ घेतला तर त्यांना हे मॉडेल फक्त आणि फक्त 64 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते. म्हणजेच जर एखाद्या ग्राहकाने या सर्व ऑफरचा लाभ घेतला तर त्याला 80 हजाराचा फोन जवळपास 16 हजार रुपये स्वस्त मिळणार आहे.

विशेष बाब अशी की या मॉडेल साठी एक्सचेंज ऑफर देखील सुरू आहे. म्हणजेच ग्राहक त्यांचा जुना आयफोन देऊन नवीन आयफोन खरेदी करू शकतात. पण जुन्या आयफोनची कंडिशन आणि त्याचे मॉडेल इयर या आधारावर त्याची किंमत निर्धारित केली जाईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत जवळपास 54 हजार 990 रुपयांची एक्सचेंज ऑफरचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.

Ahmednagarlive24 Office