VI 5G : VI यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने सुरु केली 5G सेवा.. 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

VI 5G : सर्वत्र 5G लाँच झाले असून, Airtel आणि Jio ने आपली 5G सेवा सुरु करून बरेच दिवस होत आले आहेत. या दोन्ही कंपन्यांनी अगदी काहीच दिवसात 5G रोलआउट देखील सुरू केले. आज, भारतातील अनेक शहरे आणि राज्यांमध्ये Jio आणि Airtel च्या 5G सेवा उपलब्ध आहेत. पण, VI च्या 5G सेवेबद्दल कोणतीही माहिती नव्हती. VI चे वापरकर्ते अनेक दिवस झाले VI 5G सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता VI च्या युजर्सची प्रतीक्षा संपणार असून, लवकरच VI ची 5G सेवा सुरु होणार आहे. जाणून घ्या याबद्दल.

VI यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी असून, लवकरच कंपनी भारतात आपली 5G सेवा सुरू करणार आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या वेबसाइटवर सर्व सेवा स्पष्ट करताना, आपल्या 5G सेवेबद्दल माहिती देखील दिली आहे. यामध्ये ब्रँडने सांगितले आहे की Vi 5G सेवा पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी लाइव्ह करण्यात आली आहे. याचा अनुभव तुम्हाला Vi 5G रेडी सिमच्या मदतीने घेता येणार आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांनी IMC 2023 मध्ये याबाबत माहिती दिली होती. कुमार मंगलम बिर्ला हे व्होडाफोन आयडियाच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. ते म्हणाले, ‘गेल्या एका वर्षात व्होडाफोन आयडिया टीमने 5G लाँच करण्यासाठी कोअर नेटवर्क तयार करण्यासाठी खूप काम केले आहे. येत्या तिमाहीत, कंपनी 5G रोलआउट आणि 4G विस्तारासाठी लक्षणीय गुंतवणूक देखील करणार करणार आहे.