Google Account : सावधान .. ‘ही’ चूक करू नका , नाहीतर Google तुमचे Account बंद करेल! जाणून घ्या सविस्तर
Google Account : आज प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Google Account असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या Google Account च्या मदतीने यूट्यूब तसेच गुगल ड्राइव्हचा वापर करू शकतात.
मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या निर्णयानुसार गुगलने म्हटले आहे की ते inactive account policy अपडेट करत आहे.
ज्या अंतर्गत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ इनएक्टिव असलेली खाती बंद केली जाणार आहे. आता गुगल हे का करत आहे आणि ते कधी करणार आहे याबद्दल माहिती जाणून घ्या.
Google इनएक्टिव अकाउंट्स बंद का करणार आहे ?
वापरकर्त्यांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने हे करत असल्याचे गुगलचे म्हणणे आहे. इनएक्टिव राहिलेली खाती मालवेअर किंवा बेकायदेशीर ऍक्टिव्हिटीना अधिक प्रवण असतात. ही खाती असुरक्षित आहेत. त्यांचे तपशील चोरणे देखील सोपे आहे. तसेच, गुगलने म्हटले आहे की 2-स्टेप व्हेरिफिकेशन सेटअप असलेल्या खात्यांपेक्षा इनएक्टिव अकाउंट्स 10 पट जास्त धोक्यात आहेत.
Google इनएक्टिव अकाउंट्स केव्हा बंद करणार ?
Google च्या मते, इनएक्टिव अकाउंट्स हटवण्याची प्रक्रिया डिसेंबर 2023 नंतर सुरू होईल.
Google खात्यांसह काय हटवले जाईल?
Google इनएक्टिव अकाउंट्स तसेच त्यांचा Gmail, Docs, Drive, Meet, Calendar आणि Google Photos सह सर्व डेटा हटवेल.
यूजर्सचे अकाउंट डिलीट झाले आहे हे कसे कळणार?
टप्प्याटप्प्याने खाती काढून टाकली जातील, असे गुगलचे म्हणणे आहे. वापरकर्त्यांचे खाते बंद करण्यापूर्वी कंपनी त्यांना सूचना पाठवेल. मेसेज मध्ये लिहिले असेल कि “Before deleting an account, we will send multiple notifications over the months leading up to deletion, to both the account email address and the recovery email (if one has been provided).
गुगल अकाउंट अॅक्टिव्ह कसे ठेवायचे?
Google खाते सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्हाला मेलमधील ईमेल वाचावे लागतील, गुगल ड्राइव्ह वापरावे लागेल, यूट्यूब व्हिडिओ पहावे लागतील, गुगल प्ले स्टोअरवर अॅप्स डाउनलोड करावे लागतील, गुगल सर्च वापरावे लागेल.
हे पण वाचा :- टरबूज खायला आवडतो ? तर ‘ही’ बातमी वाचाच नाहीतर होणार ..