Google: भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची ९६ वी जयंती: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील सादिया येथे झाला. आज त्यांची ९६ वी जयंती साजरी होत आहे. हजारिका हे एक प्रसिद्ध आसामी-भारतीय गायक होते, त्यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिले होते. गुगलने हजारिका यांच्या जयंतीनिमित्त खास डूडलद्वारे (google doodle) त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
96 व्या जयंतीनिमित्त Google ची श्रद्धांजली:(96th birth anniversary)
आजच्या गुगल डूडलमध्ये डॉ भूपेन हजारिका हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. मुंबईस्थित कलाकार रुतुजा माळी (rutuja mali) यांनी हे डूडल तयार केले आहे. भूपेन हजारिका हे बहुमुखी प्रतिभावंत होते. आपल्या गाण्यांनी आणि संगीताने त्यांनी हिंदी चित्रपट (hindi cinemas) आणि संगीतात अमिट छाप सोडली. भूपेन हजारिका यांनी अशी अनेक गाणी गायली आहेत जी आजही लाखो लोकांना आवडतात.
हजारिकाच्या संगीताने लोकांना एकत्र केले:
हजारिका हे ईशान्य भारतातील प्रमुख सामाजिक-सांस्कृतिक सुधारकांपैकी एक होते. त्यांच्या संगीताने सर्व स्तरातील लोकांना एकत्र केले. त्यांचे वडील मूळचे शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा शहरातील रहिवासी होते. त्याचे मूळ राज्य, आसाम हा एक प्रदेश आहे जो नेहमीच विविध जमाती आणि अनेक स्वदेशी गटांचे निवासस्थान आहे.भूपेन हजारिका यांनी सुरुवातीचे शिक्षण गुवाहाटी येथून केले. त्यानंतर त्यांनी बीएचयूमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. कॉलेजपासून त्यांची संगीताची आवड वाढली. भूपेन यांना बनारसमध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान, कांठे महाराज आणि अनोखिलाल यांच्याकडून शास्त्रीय संगीताची साथ मिळाली. यानंतर भूपेन हजारिका यांनी त्यांच्या आसामी गाण्यांमध्ये ही गायन शैली वापरली.
मरणोत्तर भारतरत्न प्रदान:(awarded bharatratna)
भूपेन हजारिका यांना संगीत आणि संस्कृतीतील अतुलनीय योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award), पद्मश्री (Padmashree) आणि पद्मभूषण (Padmabhushan)यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2019 मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.