Google Pixel Buds Pro : उत्तम फीचर्स, 11 तासांच्या बॅटरी लाइफसह नवीन अवतारात लाँच होतेय गुगलचे इअरबड्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel Buds Pro : अनेक कंपन्या आपले नवनवीन इअरबड्स बाजारात आणत आहेत. जर तुम्ही नवीन इअरबड्स घेण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण उत्तम उत्तम फीचर्स, 11 तासांच्या बॅटरी लाइफसह नवीन अवतारात गुगलचे नवीन इअरबड्स नवीन रंगात लाँच होणार आहे.

गुगल आपले इअरबड्स Google Pixel Buds Pro नवीन रंग प्रकारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार नवीन रंग पर्यायांमध्ये पोर्सिलेन आणि स्काय ब्लू रंगांचा समावेश असणार आहे. जाणून घ्या इअरबड्सची किंमत आणि फीचर्स.

नवीन रंगात लाँच होणार इअरबड्स

टिपस्टर पारस गुगलानी यांनी असा दावा केला आहे की Google त्याच्या 4 ऑक्टोबरच्या इव्हेंटमध्ये Google Pixel Buds Pro इयरबड्सचे काही नवीन रंग प्रकार सादर करू शकते. नवीन रंग पर्यायांत पोर्सिलेन आणि स्काय ब्लू रंगांचा समावेश असणार आहे.

Google Pixel Buds Pro TWS मागील वर्षी Google I/O वर लॉन्च केला होता. तो कोरल, लेमनग्रास, फॉग आणि चारकोल अशा चार रंग पर्यायांत येतो. आता कंपनीकडून या लाइनअपमध्ये पोर्सिलेन आणि स्काय ब्लू रंग जोडण्यात येणार आहे.

Google ने या यंदाच्या वर्षी Google I/O वर पोर्सिलेन रंग पर्यायांत Google Pixel Fold आणि Google Pixel Tab लाँच केले आहे. डिझाइन आणि फीचर्सबद्दल बोलयचे झाले तर Google Pixel Buds Pro Porcelain आणि Sky Blue हे बड्स प्रो च्या विद्यमान रंग प्रकारांसारखेच असू शकतात.

जाणून घ्या Google Pixel Buds Pro ची खासियत

कस्टम डिझाइन करण्यात आलेले 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स इअरबड्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (एएनसी), ट्रान्सपरन्सी मोड आणि व्हॉल्यूम इक्वलायझर सारख्या फीचर्सला सपोर्ट केला आहे.

या इयरबडमध्ये ट्रिपल माइक सेटअप पाहायला मिळेल. हे ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीवर काम करेल. तसेच या इअरबड्समध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट दिला आहे. त्यात USB टाइप-सी पोर्टसह QI वायरलेस चार्जिंग सपोर्ट पाहायला मिळेल आहे.हे इअरबड्स 11 तासांची बॅटरी लाइफ देतात असा दावा कंपनीने केला आहे. त्यांची किंमत 19,990 रुपये इतकी आहे.