Samsung Galaxy : मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंग हे सर्वात मोठे नाव आहे. अशातच कपंनी वेळोवेळी आपल्या उपकरणांवर मोठी सूट ऑफर करत असते, कपंनीने नुकताच एक फोन स्वस्त केला आहे, जो ग्राहकांना कमी किंमतीत मिळत आहे.
सध्या कपंनी आपल्या अनके फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलतींचा लाभ देत जात आहे. Samsung Galaxy S23 च्या 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटवर कपंनी 9000 रुपयांची पूर्ण सूट देत आहे. अशातच ग्राहक कंपनीच्या वेबसाइटशिवाय, शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून देखील हे डिव्हाइस स्वस्तात खरेदी करू शकतात.
Galaxy S23 लाइनअपची खास गोष्ट म्हणजे कंपनीने यामध्ये लेटेस्ट Galaxy AI फीचर्स समाविष्ट केले आहेत. या वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये सर्कल-टू-सर्च, लाइव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रिटर आणि फोटो असिस्ट इत्यादींचा समावेश आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन असल्याने, Galaxy S23 डिस्प्ले, कॅमेरा आणि कामगिरीच्या बाबतीत अतुलनीय आहे आणि प्रीमियम अनुभव देतो.
ऑफर
Samsung Galaxy S23 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. याशिवाय 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक कार्डद्वारे पेमेंट करून कंपनीच्या वेबसाइट आणि ॲमेझॉन या दोन्हीवरून हे उपकरण खरेदी केल्यास तुम्हाला9000 च्या झटपट सूटचा लाभ मिळू शकतो. अशा प्रकारे हा फोन 55,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तुम्ही खरेदी करू शकता.
जर तुम्हाला बँकेच्या ऑफरऐवजी एक्सचेंज डिस्काउंट हवा असेल, तर तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात कमाल 27,600 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या सवलतीचे मूल्य जुन्या उपकरणाच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
Samsung Galaxy S23 चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S23 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1750nits च्या शिखर ब्राइटनेससह गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे संरक्षित 6.1-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. IP68 रेट केलेल्या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि Android 14 वर आधारित OneUI 6.1 सॉफ्टवेअर स्किन आहे. मागील पॅनलवर 50MP, 10MP, 12MP ट्रिपल कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा व्यतिरिक्त, 3900mAh बॅटरी देखील आहे. 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग व्यतिरिक्त फोनमध्ये 4.5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.