टेक्नोलाॅजी

OnePlus Phones : नवीन मोबाईल घेण्याचा विचारत करत असाल तर थोडं थांबा, वनप्लस कपंनी लॉन्च करत आहे बजेट स्मार्टफोन…

Published by
Ahmednagarlive24 Office

OnePlus Mobile Phones : वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कपंनी लवकरच आपला नवीन फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. वनप्लसचा नवीन फोन पुढील आठवड्यात हा फोन लॉन्च करणार आहे, अशातच जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा.

नवीन फोन लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने टीझर पोस्टर जारी केले आहेत. हा नवीन फोन OnePlus Nord CE4 Lite असेल. OnePlus Nord CE3 Lite चे हे अपग्रेड व्हर्जन म्हणून भारतीय बाजारात लॉन्च केले जाईल. या फोनमध्ये ग्राहकांना काय खास पाहायला मिळू शकते, पाहूया…

OnePlus तर्फे 18 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. या फोनच्या लॉन्चसाठी कंपनीच्या अधिकृत साइट आणि Amazon वर एक मायक्रोसाईट लाईव्ह करण्यात आली आहे. यामध्ये डिव्हाईसच्या लॉन्च डेटचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या कंपनीने फोनचे नाव उघड केलेले नाही. परंतु OnePlus Nord CE4 Lite Amazon बॅनरच्या URL मध्ये वाचता येते. म्हणजेच या फोनचे लॉन्चिंग निश्चित आहे. भारतात या उपकरणाची किंमत 20,000 रुपयांच्या आत असू शकते. म्हणजेच हा एक बजेट फोन म्हणून लॉन्च करण्यात येईल.

OnePlus Nord CE4 Lite ची संभाव्य वैशिष्ट्ये :-

लीक्सनुसार, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले असेल. त्याच वेळी, Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 16MP मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लीक्सनुसार, OnePlus Nord CE4 Lite 5G Android 14 आधारित कस्टम OS वर चालेल. त्याचप्रमाणे, याला दोन Android OS अद्यतने मिळतील. त्याची बॅटरी 5,500mAh असू शकते. तसेच, यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office