टेक्नोलाॅजी

आधार कार्ड हरवले तर डोन्ट वरी! टेन्शन घेऊ नका फक्त ‘या’ सहा गोष्टी करा आणि आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक मिळवा

Published by
Ajay Patil

कागदपत्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कुठले कागदपत्र असेल तर सध्या तरी आधार कार्ड हेच नाव आपल्या ओठी येईल. कारण आता तुम्हाला प्रत्येक छोट्या-मोठ्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड मागितले जाते व ते तुम्हाला द्यावे लागते. परंतु बऱ्याचदा आधार कार्डच नाही तर कुठलेही महत्त्वाचे कागदपत्र आपल्याकडून हरवते किंवा गहाळ होते.

परंतु यानंतर जर आपल्याला ते कागदपत्रे लागले तर मात्र आपली खूप धावपळ उडते व बऱ्याचदा आपली कामे अशा कागदपत्रांविना होत नाही. एखाद्या वेळेस जर काही महत्त्वाचे काम असेल व तुमचे आधार कार्ड जर हरवले तर मात्र  समस्या आल्याशिवाय राहणार नाही.

त्यामुळे तुमचे देखील आधार कार्ड कुठे हरवले असेल किंवा शोधाशोध करून देखील घरात सापडत नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा तुमचा नोंदणी क्रमांक अगदी सहजतेने मिळवू शकतात. आता तुम्हाला याकरिता काही स्टेप फॉलो करणे गरजेचे आहे.

 आधार कार्ड हरवले असेल तर नंबर मिळवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1- सगळ्यात अगोदर अधिकृत वेबसाईटला भेट दया अशाप्रसंगी तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईल मधील गुगल ओपन करावे आणि त्या ठिकाणी http://www.uidai.gov.in टाईप करावे.

त्यानंतर तुमच्यासमोर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ ओपन होते व त्यावर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड विषयीची संपूर्ण माहिती मिळते.

2-

रिट्रीव्ह लॉस्ट यूआयडी/ ईआयडी युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर रिट्रीव्ह लॉस्ट यूआयडी/ ईआयडी हा पर्याय शोधावा. हा पर्याय तुम्हाला बहुदा आधार सेवा या विभागांमध्ये आढळून येतो.

त्यानंतर त्यावर क्लिक करावे व क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होते. या पेजवरून तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू करू शकता.

3- वैयक्तिक माहिती द्या तुमची ओळख पटवून देण्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तसेच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर इत्यादीचा समावेश करावा लागेल.

मात्र तुम्ही जो मोबाईल नंबर नमूद कराल तो तुमच्या आधारशी लिंक म्हणजेच रजिस्टर असणे गरजेचे आहे.कारण या नंबर वर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल.

4- मिळतील दोन पर्याय त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक किंवा नाव नोंदणी आयडीमध्ये नक्की काय रिट्रीव करायचा आहे हे ठरवावे व त्यावर क्लिक करावे. समजा तुम्हाला जर तुमचा आधार क्रमांक मिळवायचा असेल तर आधार क्रमांक म्हणजेच युआयडी हा पर्याय निवडावा लागेल.

त्याशिवाय तुम्हाला जर नाव नोंदणी क्रमांक मिळवायचा असेल तर आधार नोंदणी क्रमांक म्हणजेच ईआयडी हा पर्याय निवडावा लागेल.

5- ओटीपी पाठवा वर क्लिक करावे त्यानंतर ओटीपी पाठवा या बटणावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डशी जो नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर तुम्हाला ओटीपी मिळतो

व तो वेबसाईटवर दिलेल्या फील्डमध्ये टाकावा. तसेच ओटीपी सोबत तुम्हाला स्क्रीनवर एक सुरक्षा कोड दिसेल तो देखील टाकावा व पुढे सबमिट करा यावर  क्लिक करावे.

6- यानंतर मिळेल आधार किंवा नोंदणी क्रमांक त्यानंतर तुमच्या वैयक्तिक माहितीची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार किंवा नोंदणी क्रमांक पाठवला जातो.

ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार हा क्रमांक किंवा नंबर दिलेला ईमेल पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर तुम्हाला पाठवला जातो.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने  आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक घरबसल्या मिळवू शकता.

Ajay Patil