Infinix INBook X3 Slim : Apple सारखे डिझाइन असणारा हा लॅपटॉप अवघ्या 33,990 रुपयात करा खरेदी, टिकेल 10 तास बॅटरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Infinix INBook X3 Slim : सध्या स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉपचाही खूप वापर वाढला आहे. बाजारात नवनवीन फीचर्स असणारे लॅपटॉप दाखल होऊ लागले आहेत. या प्रत्येक लॅपटॉपची किंमत वेगवेगळी आहे. जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कारण आज बाजारात Infinix INBook X3 Slim हा लॅपटॉप लाँच झाला आहे. ज्याचे Apple सारखे डिझाइन आहे. तो तुम्ही आता अवघ्या 33,990 रुपयात खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या लॅपटॉपची 10 तास बॅटरी टिकते. परंतु Infinix INBook X3 Slim हा लॅपटॉप तुम्हाला लगेच खरेदी करता येणार नाही. कारण 25 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवरून त्याची विक्री होणार आहे.

जाणून घ्या Infinix INBook X3 किंमत

Infinix INBook X3 Slim हा लाल, हिरवा, राखाडी आणि निळ्या रंगात लाँच झाला आहे. जर याच्या किमतीचा विचार केला तर Infinix INBook X3 Slim Core i3 प्रोसेसर 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज असणाऱ्या या मॉडेलची भारतीय बाजारपेठेतील किंमत 33,990 रुपये इतकी आहे.

16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असणाऱ्या Core i5 मॉडेलची किंमत 39,490 रुपये इतकी आहे. तर Core i7 प्रोसेसरसह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 49,990 रुपये इतकी आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्हाला हा लॅपटॉप 25 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

पहा Infinix INBook X3 Slim चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: 14 इंच फुल HD डिस्प्ले, 300 nits ब्राइटनेस, 72% NTSC कलर गॅमट.
  • प्रोसेसर: इंटेल UHD ग्राफिक्ससह १२व्या जनरेशन इंटेल कोर i3-1215U प्रोसेसर, Iris XE ग्राफिक्ससह 12व्या जनरेशन इंटेल कोर i5-1235U / Core i7-1255U प्रोसेसर मिळेल.
  • रॅम आणि स्टोरेज: 8GB/16GB LPDDR4X, 256GB/512GB स्टोरेज.
  • बॅटरी: 65W टाइप-सी फास्ट चार्जिंगसह 50Wh बॅटरी.
  • कनेक्टिव्हिटी: Wi-Fi 802.11 b/g/n/ax, Bluetooth v5.1, दोन USB-C पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, SD कार्ड स्लॉट, एक HDMI 1.4 पोर्ट, एक 3.5mm हेडफोन जॅक, दोन डिजिटल मायक्रोफोन, स्टिरीओ स्पीकर, डीटीएस ऑडिओ प्रोसेसिंग.