Infinix Zero 30 5G vs Vivo V29e : बाजारात काही दिवसांपूर्वी Infinix Zero 30 5G हा स्मार्टफोन लाँच झाला आहे यात Infinix ने जबरदस्त फीचर्स दिली आहेत. अशातच आता विवो आपला Vivo V29e हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अशातच आता जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा, ही बातमी वाचा. नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. या दोन्ही स्मार्टफोनपैकी कोणता फोन खरेदी करावा असा प्रश्न अनेकांना पडत आहे. जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे.
जाणून घ्या स्मार्टफोनच्या किमती
किमतीचा विचार केला तर Flipkart वर Infinix Zero 30 5G ची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलसाठी ती 24,999 रुपयांपर्यंत जाते. बँक ऑफर म्हणून तुम्हाला यावर 2000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.
तर दुसरीकडे, Vivo V29e ची मूळ किंमत 31,999 रुपये इतकी आहे, परंतु फ्लिपकार्ट स्पेशल सेलमध्ये तुम्हाला हा फोन अवघ्या 26,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर 2,500 पर्यंत झटपट बँक सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जाणून घ्या खासियत
Infinix च्या या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरा सेटअप 108MP 13MP 2MP तसेच समोर 50MP देण्यात आला आहे. तर दुसरीकडे Vivo V29e मध्ये 64MP 8MP आणि 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी पहायला मिळेल. हे फोन एकदा चार्ज करून तुम्ही ते दिवसभर वापरू शकता. vivo V29e 5G फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालेल आणि Infinix मध्ये Dimensity 8020 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कोण आहे सर्वोत्तम?
खरंतर Vivo V29e 5G हा एकूण दोन स्टोरेज प्रकारांमध्ये 8GB RAM आणि 128GB, 256GB तसेच लाल आणि निळ्या रंगांत तुम्हाला खरेदी करता येईल. तर दुसरीकडे, Infinix Zero 30 8GB 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज व्यतिरिक्त हिरव्या आणि सोनेरी अशा दोन रंगांत तुम्हाला खरेदी करता येईल. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार या दोन फोनमध्ये कोणता चांगला आहे हे ठरवू शकता.