iPhone 12 : मस्तच! पहिल्यांदाच 35,800 रुपयांच्या सवलतीत घरी न्या iPhone 12, ‘या’ ठिकाणी मिळतेय संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 12 : बाजारात लवकरच iPhone 15 लाँच होणार आहे. यात कंपनीकडून इतर मॉडेल्सपेक्षा उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. परंतु हा फोन लाँच होण्यापूर्वी कंपनीचे काही मॉडेल्स तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

तुमच्यासाठी अशी भन्नाट संधी Amazon वर मिळत आहे. मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात तुम्ही iPhone 12 खरेदी करू शकता. पहिल्यांदाच 35,800 रुपयांच्या शानदार सवलतीत तुम्हाला हा फोन घरी नेता येईल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

iPhone 12 वर मिळणारी सवलत

किमतीचा विचार केला तर iPhone 12 चा बेस 64GB व्हेरिएंटची साधारणपणे 59,900 रुपयांना विक्री केली जात आहे. परंतु आयफोन 12 सध्या Amazon वर 18 टक्के डिस्काउंटवर विकला जात आहे. या शानदार सवलतीनंतर त्याची किंमत 48,990 रुपये आहे. तसेच खरेदीदार आयफोन 12 ची किंमत आणखी कमी करण्यासाठी एक्सचेंज डील आणि बँक ऑफर सारख्या इतर ऑफर घेऊ शकतात. जर तुम्ही HDFC बँकेच्या कार्डाने फोन खरेदी केला तर तुम्हाला 2,000 रुपयांची झटपट सवलत मिळेल.

जाणून घ्या इतर ऑफर

ग्राहकांना आता Amazon च्या iPhone 12 वर बिग एक्सचेंज बोनस मिळेल. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 24,900 रुपयांची सवलत मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील एक्सचेंज ऑफरची उपलब्धता तपासण्यासाठी पिन कोड देखील टाकावा लागणार आहे.

खासियत

आयफोन 12 हा तुम्ही आत्ता खरेदी करू शकणार्‍या सर्वात मौल्यवान आयफोनपैकी एक असून उत्तम परफॉर्मन्स, उत्तम कॅमेरा आणि दीर्घ बॅटरी लाइफ आपल्या ग्राहकांसाठी कंपनीकडून देण्यात आली आहे. हे ऍपलच्या A14 बायोनिक प्रोसेसरसह येते. इतकेच नाही तर यात फक्त iOS 17 अपडेट मिळण्याची अपेक्षा नाही तर भविष्यातील काही अपडेट देखील मिळू शकतात.