iPhone 14 : बंपर डिस्काउंट! 17 हजारांनी स्वस्तात खरेदी करता येईल iPhone 14, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 : लवकरच iPhone 15 लाँच होणार आहे. या फोनमध्ये कंपनीने आपल्या नवीन ग्राहकांसाठी उत्तम फीचर्स दिली आहेत. परंतु या फोनची किंमत जास्त असेल. दरम्यान ही सीरिज लाँच होण्यापूर्वी तुम्हाला iPhone 14 कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

आता iPhone 14 वर 17 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला मूळ किमतीपेक्षा हा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. तुमच्यासाठी अशी शानदार ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.

जाणून घ्या ऑफर

किमतीचा विचार केला तर फ्लिपकार्टवर iPhone 14 चा लाल रंगाचा प्रकार 79,900 रुपयांच्या लॉन्च किमतीच्या तुलनेत 66,999 रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध करण्यात आला आहे. तसेच HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 4000 रुपयांच्या अतिरिक्त सवलत देखील मिळत आहे, त्यानंतर या फोनची किंमत 62,999 रुपयांपर्यंत खाली येते. या ऑफरसह, ग्राहकांना या फोनवर एकूण 16,901 रुपयांची सवलत मिळत आहे.

तसेच या फोनवर एक्सचेंज ऑफरचा फायदा स्वतंत्रपणे उपलब्ध असून समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर, त्याचे मॉडेल आणि स्थितीनुसार तुम्हाला हजारो रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्हाला आयफोन 13 खरेदी करायचा असेल तर तो फ्लिपकार्टवर 56,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लिस्ट केला आहे. HDFC बँक कार्ड वापरकर्त्यांसाठी, डिस्काउंटनंतर या फोनची प्रभावी किंमत 54,999 रुपये इतकी होते.

iPhone 14 खासियत

मागील वर्षी iPhone 14 लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि उत्तम फोटोग्राफीसाठी प्रगत कॅमेरा प्रणाली तुम्हाला पाहायला मिळेल. सिनेमॅटिक मोडसह, 30fps वर 4K डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. A15 बायोनिक चिप सह, त्याची कार्यक्षमता मजबूत आहे प्रीमियम बिल्डसह ग्राहकांना यात 5G कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळेल.

iPhone 15

Apple कडून आपल्या जागतिक आयफोन लॉन्च इव्हेंटची घोषणा करण्यात आली आहे. 12 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमात नवीन iPhone 15 मालिका मॉडेल सादर करण्यात येतील. नवीन लाइनअपमध्ये चार आयफोन मॉडेल्सचा समावेश असेल. प्रो आयफोन मॉडेल्स यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतील. या मॉडेल्समध्ये कॅमेरा अपग्रेड दिसेल. नवीन आयफोन मॉडेल्स अगोदरच्या मॉडेल्सच्या तुलनेत जास्त महाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.