iPhone 14 : त्वरा करा! अवघ्या 14,948 रुपयांना खरेदी करा iPhone 14, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 : Apple चे फोन जवळपास सर्वांना आवडतात. कंपनी प्रत्येक वर्षी अनेक फोन लाँच करत असते. महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे फोन महाग असले तरी कंपनीच्या फोनला सर्वात जास्त मागणी असते. नुकतीच कंपनीने आपली iPhone 15 सीरिज लाँच केली आहे.

अनेकांना iPhone खरेदी करता येत नाहीत, कारण iPhone च्या किमती इतर फोनपेक्षा खूप जास्त असतात. परंतु आता तुम्ही iPhone 14 हा फोन अवघ्या 14,948 रुपयांना खरेदी करू शकता. अशी धमाकेदार संधी फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहा संपूर्ण ऑफर.

कंपनीने मागच्या वर्षी iPhone 14, iPhone 14 Pro आणि Plus सोबत 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. पण यावर्षी Apple iPhone 15 सीरीज लाँच झाल्यानंतर फोनची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली. सध्या iPhone 14 Flipkart वर 61,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे.

इतकेच नाही तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड, विशेष किंमत वापरून, तुम्ही iPhone वर 7901 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. त्यानंतर त्याची किंमत 54,098 रुपये इतकी होऊ शकते.

तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात फ्लिपकार्ट 39,150 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. जर सर्व ऑफर जोडल्या, तर डिस्काउंटसह तुम्ही iPhone 14 फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ 14,948 रुपयांना खरेदी करता येईल. हे लक्षात ठेवा एक्सचेंज ऑफर प्रत्येक फोनवर सारखी नसते. फोनची स्थिती आणि पुनर्विक्री मूल्य यावर विनिमय किंमत ठरवण्यात येते.

iPhone 14 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या मजबूत फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या मागील बाजूस दोन 12MP कॅमेरे आणि Apple चा A15 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. यात 3,279mAh बॅटरी दिली आहे.

ग्राहकांना यात सॅटेलाइट फीचर मिळेल. जे एक आपत्कालीन फीचर असून समजा जवळपास कोणतेही नेटवर्क नसेल तर फोन थेट सॅटेलाइटशी कनेक्ट करून मदत मिळेल.