iPhone 14 Plus : आकर्षक ऑफर! iPhone 14 Plus वर मिळत आहे बंपर सवलत, ‘इतक्या’ स्वस्तात येईल खरेदी करता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 Plus : समजा तुम्हाला मोठी स्क्रीन असणारा स्मार्टफोन आवडत असल्यास किंवा तुम्हाला बराच वेळ कंटेंट पाहायचा असेल, तर तुमच्यासाठी iPhone 14 Plus हा उत्तम पर्याय आहे. फक्त वेगवान प्रोसेसर, शानदार फीचर्स आणि कॅमेराच नाही तर iPhone 14 Plus मध्ये मोठा डिस्प्ले दिला आहे.

कंपनीने मागील वर्षी 89,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत केला आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर Flipkart वर मिळत आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

मिळत आहे 48,999 रुपयांची एक्सचेंज ऑफर

हे लक्षात घ्या की 128GB स्टोरेज असणारा iPhone 14 Plus आहे. किमतीचा विचार केला तर हा फोन 76,999 रुपयांच्या किंमतीत Flipkart वर लिस्ट झाला आहे. तसेच, तुम्हाला HDFC कार्ड वापरण्यावर 4,000 रुपयांची सवलत मिळेल. या शानदार डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 72,999 रुपये असणार आहे. याशिवाय फोनवर 48,999 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध मिळेल. परंतु जर तुम्हाला एक्सचेंज बोनसचा लाभ घ्यायचा असेल तर ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या iPhone 14 Plus चे फीचर्स

या फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीकडून iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. तर दुसरीकडे, हा Apple फोन A15 Bionic चिपसेटने सुसज्ज आहे. हा iOS 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. तुम्हाला या फोनमध्ये 128GB, 256GB आणि 512GB असे तीन स्टोरेजचे पर्याय मिळतील. हा स्मार्टफोन 26 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ देतो, असा दावा कंपनीने केला आहे.

मिळेल मजबूत कॅमेरा

तर दुसरीकडे, iPhone 14 Plus मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. या Apple च्या स्मार्टफोनमध्ये 1.9um सेन्सर आणि f/1.7 अपर्चर लेन्ससह 12MP वाइड-एंगल कॅमेरा दिला आहे. तसेच, यात 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 12MP TrueDepth कॅमेरा आहे जो F/1.9 अपर्चर लेन्ससह तुम्हाला खरेदी करता येईल.