iPhone 15 : जर तुम्ही आयफोन प्रेमी असाल आणि सध्या तुमचा विचार असेल iPhone घेण्याचा तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका खास ऑफर बद्दल सांगणार आहोत, ज्यांतर्गत तुम्ही iPhone 15 फक्त 14 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, काय आहे ही ऑफर जाणून घेऊया….
Apple चा नवीनतम लॉन्च केलेला स्मार्टफोन iPhone 15 ज्याची किंमत 71,999 रुपये आहे, हा फोन तुम्हाला Flipkart वर 14 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला iPhone 15 स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुम्हाला लवकर खरेदी करण्याची योजना आखावी लागेल.
काय आहे ऑफर?
Apple iPhone 15 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 71,999 रुपये आहे. त्याच्या गुलाबी रंगाच्या व्हेरिएंटची ही किंमत आहे. या फोनची लॉन्च किंमत 79,999 रुपये आहे, जी फ्लिपकार्टवर 9 टक्के डिस्काउंटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीकडून iPhone 15 च्या खरेदीवर 53,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याव्यतिरिक्त, 3000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज सूट दिली जात आहे, जी निवडक स्मार्टफोन मॉडेल्सवर लागू होईल. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचा जुना फोन देऊन संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, तुम्हाला कमाल 56,000 रुपयांची सूट मिळू शकेल. पण लक्षात घ्या एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असेल.
बँक सवलत ऑफर
याशिवाय यूजर्सना ICICI बँक कार्डवर 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. अशा प्रकारे तुमची एकूण सूट सुमारे 60 हजार रुपये होईल. अशास्थितीत, iPhone 15 ची अंतिम किंमत 11,999 रुपये होईल आणि तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकाल.
फीचर्स
फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची उत्पादन वॉरंटी आणि ॲक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. फोन 6.1 इंच रेटिना XDR डिस्प्ले सह येतो. यात 48MP मुख्य कॅमेरा सोबत 12 MP दुय्यम कॅमेरा आहे. तसेच 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.