iPhone 15 : जगातील सर्वात आघाडीची टेक कंपनी अॅपल आपली आगामी लेटेस्ट आयफोन सिरीज iPhone 15 या वर्षी लाँच होणार आहे. ही फोन सीरिज लाँच या वर्षातील सर्वात लोकप्रिय लाँचपैकी एक असेल. लीक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी हा फोन लॉन्च होईल.
परंतु कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. आगामी फोनमध्ये कंपनी शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देऊ शकते. सर्व फोनप्रमाणे या फोनलाही बाजारात चांगली मागणी असणार आहे. अनेकजण या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घेऊयात आयफोनच्या आगामी मॉडेलचे फीचर्स आणि किंमत.
सूत्रांच्या माहितीनुसार, iPhone 15 आणि त्याच्या प्लस व्हर्जनच्या किमती सारख्या राहू शकतात. याचा अर्थ असा होऊ शकतो की नियमित iPhone 15 ची किंमत यूएस मध्ये $799 आणि भारतात 79,900 रुपये असेल. Apple आयफोन 13 सारख्याच किमतीत नियमित मॉडेल विक्री करण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. तर iPhone 15 Plus ची किंमत $899 किंवा 89,900 रुपये असेल.
तर दुसरीकडे, आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर ते वाढू शकते. iPhone 15 Pro ची किंमत मागील वर्षीच्या $999 वरून $1,099 पर्यंत वाढू शकते. आयफोन 14 प्रो यूएस बाजार किंमतीपेक्षा $ 300 च्या वाढीसह सादर केला होता. iPhone 15 Pro ची किंमत $99 पर्यंत जाईल. तर संभाव्यत: भारतातील किंमत 10,000 रुपयांनी वाढून एकूण 1,39,900 रुपये होईल.
iPhone 15 Pro Max मागील वर्षीच्या $1,099 च्या तुलनेत $1,299 ला लॉन्च होईल. iPhone 14 Pro Max सह, Apple ने किंमत $300 ने वाढवली असून भारतात त्याची किंमत 1,39,900 रुपये इतकी केली. तसेच, कंपनीकडून अधिकृत किंमत लॉन्चच्या दिवशीच जाहीर केली जाणार आहे.
असे म्हटले जात आहे की iPhone 15 सीरीज शिवाय, कंपनी सप्टेंबरच्या इव्हेंटमध्ये अपडेटेड Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 मॉडेल सादर केले जाईल.