टेक्नोलाॅजी

iPhone 17 चा तपशील लीक ! मिळणार जबरदस्त फीचर्स असलेला इतका मोठा डिस्प्ले, पहा खासियत

Published by
Ahmednagarlive24 Office

iPhone 17 : Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून भारतीय मार्केटमध्ये त्यांचे शानदार iPhone लाँच केले आहेत. भारतीय मार्केटमध्ये iPhone ची किंमत जरी जास्त असली तरी ग्राहकांमध्ये त्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचा iPhone 15 लाँच केला आहे. या स्मार्टफोन ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चालू वर्षी 2024 मध्ये Apple कडून त्यांची iPhone 16 सिरीज लाँच केली जाणार आहे.

iPhone 16 सिरीज लाँच करण्यापूर्वीच फोनचे फीचर्स आणि तपशील लीक झाले आहेत. स्मार्टफोनमध्ये मजबूत बॅटरी आणि उत्तम कॅमेरा देण्यात येणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीकडून त्यांची iPhone 16 सिरीज लाँच केली जाईल.

Apple कंपनीकडून 2022 मध्ये iPhone 14 Pro सिरीज 120Hz प्रोमोशन डिस्प्ले लाँच केली आहे. विशेष प्रो-मोशन डिस्प्ले केवळ प्रो सीरीजच्या स्मार्टफोनमध्येच समाविष्ट केला होता. iPhone 16 सिरीज लाँच होण्यापूर्वीच iPhone 17 चे डिस्प्ले फीचर्स लीक झाले आहेत.

iPhone 17 मध्ये उत्कृष्ट डिस्प्ले असेल

द इलेकच्या अहवालात सांगण्यात आले आहे की, कंपनी iPhone 17 आणि iPhone 17 Plus मध्ये प्रो-मोशन डिस्प्ले देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतापर्यंत Pro सिरीजमध्ये असा डिस्प्ले देण्यात येत होता मात्र आता iPhone 17 सिरीजमध्ये देखील असा डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. iPhone 17 हा पहिला फोन असेल ज्यामध्ये प्रो-मोशन डिस्प्ले देण्यात येणार आहे.

सप्टेंबर 2025 मध्ये iPhone 17 आणि iPhone 17 Plus लॉन्च केला जाणार आहे. कंपनीकडून पहिल्यांदाच LTPO डिस्प्ले पॅनल वापरला जाऊ शकतो. iPhone 17 सिरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये हा डिस्प्ले पाहायला मिळेल. यापाठीमागच्या फक्त प्रो मॉडेल्समध्ये हा डिस्प्ले देण्यात येत होता.

LTPO डिस्प्लेचे खास वैशिष्ट्ये

LTPO हा डिस्प्ले डायनॅमिक रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले पॅनेल आहे, ज्यामुळे स्क्रीन डिस्प्ले आपोआप 1Hz वरून 120Hz वर जात राहतो. तुमच्या फोनची बॅटरी वाचवण्यासाठी हा डिस्प्ले आपोआप ऑपरेट होत असतो.

Apple स्मार्टफोन कंपनीकडून iPhone 17 आणि iPhone 17 Plus स्मार्टफोनमध्ये LTPO पॅनेलसाठी BOE वापरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कंपनीकडून त्यांच्या फोनच्या डिस्प्ले पॅनलसाठी BOE वापरण्यात आलेले नाही.

Ahmednagarlive24 Office