टेक्नोलाॅजी

आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी! iPhone ओरिजनल आहे की डुप्लिकेट ? कसं चेक करणार ? वाचा….

Published by
Tejas B Shelar

iPhone Real Or Fake : एप्पल चा आयफोन हातात असावा असे जवळपास प्रत्येकच तरुणाला वाटते. अलीकडे तरुणाई मध्ये आयफोन खरेदीची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. यासाठी तरुण-तरुणी काबाडकष्ट करून पैसे जमवतात. कित्येक महिने पैसे सेव्ह करून आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण करतात. मात्र तुम्ही खरेदी केलेला आयफोन जर डुप्लिकेट अर्थातच बनावट निघाला तर…. हो, बाजारात असेही काही लोक आहेत जे की हुबेहूब आयफोन सारखा दिसणारा फोन कस्टमाईज करतात.

असे लोक ज्यांनी आधी कधीच iPhone वापरलेला नाही अशा ग्राहकांना असा डुप्लिकेट फोन विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. असे अनेक प्रकरण समोर आले आहेत. यामुळे तुम्हीही आयफोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच आयफोन खरेदी करणार असाल, प्रामुख्याने सेकंड हॅन्ड आयफोन जर खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.

बनावट किंवा रीफर्बिश्ड आयफोन कसा ओळखणार?

तुम्हाला जर आयफोन ओरिजनल आहे की बनावट हे चेक करायचे असेल तर यासाठी तुम्हाला आधी त्या आयफोन चा IMEI नंबर चेक करावा लागणार आहे. प्रत्येक फोनमध्ये 15-17 अंकी हा नंबर असतो. अँड्रॉइड असो किंवा एप्पल आईफोन असो प्रत्येकांमध्ये हा युनिक नंबर असतोच.

याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा नंबर सर्व फोनसाठी वेगवेगळा असतो. यामुळे या IMEI नंबर द्वारे फोन ओरिजनल आहे की डुप्लिकेट हे सहजतेने ओळखता येते. यासाठी तुमच्या iPhone च्या सेटिंग्जमध्ये जा. यानंतर General वर जा आणि About च्या पर्यायावर क्लिक करा.

येथे तुम्हाला आयफोनचा IMEI क्रमांक दाखवला जाईल. जर येथे IMEI नंबर दिला नसेल तर तुमचा आयफोन बनावट असू शकतो. विशेष बाब अशी की तुम्ही हा IMEI नंबर ऑनलाइन सुद्धा चेक करू शकता.

IMEI नंबर ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला एप्पलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. यासाठी appleid.apple.com वर जा आणि ऍपल आयडीने साइन इन करा. येथे डिव्हाइसेस विभागात, तुम्हाला मालिका आणि IMEI/MEID क्रमांकाचा पर्याय दिसेल.

आयफोनच्या सेटिंग्जमधील आयएमईआय नंबर आणि आयफोनच्या बॉक्सवर लिहिलेला आयएमईआय नंबर जुळवा, हा क्रमांक समान असावा. जर हे समान नसतील तर तो आयफोन डुप्लिकेट आहे असे समजावे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com