iQoo New Series : जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन, iQoo ने सादर केले हे स्मार्टफोन..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iQoo New Series : iQoo ही सध्या मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून आहे. यासाठीच कंपनीने आपले दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. iQoo 12 Pro आणि iQoo 12 असे या स्मार्टफोनचे नाव असून, हे स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.दरम्यान, भारतामध्ये हे फोन 12 डिसेंबर रोजी लाँच होणार असून. असा दावा करण्यात आला आहे की स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज भारतात येणारा हा पहिला स्मार्टफोन असेल. दरम्यान, जाणून घ्या या फोनच्या सर्व फीचर्स बद्दल.

दरम्यान, हा स्मार्टफोन ब्रँड Vivo चा सब-ब्रँड म्हणून ओळखला जातो. हा फोन 3 रंग पर्यायांमध्ये येतो. यामध्ये क्वालकॉमच्या नवीन प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 आहे. iQoo 12 Pro आणि iQoo 12 मध्ये 144Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे. या फोन्समध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे. दरंयान, याचे दोन्ही मॉडेल 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. तर याच्या प्रो मॉडेलला IP68 रेटिंग देखील आहे.

iQoo 12 Pro वैशिष्ट्य

iQoo 12 Pro, हा फोन ड्युअल नॅनो-सिम स्लॉटसह येत असून, त्यामध्ये Android 14 OS आहे. तर या फोनमध्ये 6.78-इंचाचा 2K (1,440×3,200 pixels) AMOLED E7 डिस्प्ले HDR सपोर्ट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आणि 92.42 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. दरम्यान, नवीन iQoo स्मार्टफोनमध्ये octa-core 4nm Snapdragon 8 Gen 3 SoC आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आहे. दरम्यान, हा एक गेमिंग फोन ठरेल.

iQoo 12 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात f/1.68 लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे. 100X डिजिटल झूमसह 64-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर देखील आहे. याशिवाय 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तर यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देखील आहे.

iQoo 12 Pro मध्ये 1TB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, USB OTG, NFC, Beidou, GPS, GLONASS, GALILEO आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. यासोबतच iQoo 12 Pro मध्ये 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेली 5100mAh बॅटरी आहे. तर या फोनचे वजन अंदाजे 210 ग्रॅम इतके आहे.

iQoo 12 वैशिष्ट्ये

iQoo 12 मध्ये iQoo 12 Pro प्रमाणेच सिम, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वैशिष्ट्ये आहेत. यात 1.5K डिस्प्ले, 144Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.

iQoo 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. यासोबतच 64 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-एंगल सेन्सर देण्यात आला आहे. iQoo 12 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. iQoo 12 मध्ये 1TB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर या फोनचे वजन हे किमान 203 ग्रॅम आहे.

किंमत

iQoo 12 Pro ची किंमत अंदाजे रु. 57,000 पासून सुरू होणार आहे. दरम्यान, ही त्याच्या 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत आहे. तर त्याच्या 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत ही अंदाजे 64,000 रुपये इतकी आहे. दरम्यान, iQoo 12 Pro चा 16GB + 1TB प्रकार देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत अंदाजे 68,000 रुपये इतकी असू शकते.

तर iQoo च्या iQoo 12 ची किंमत अंदाजे रु. 45,000 पासून सुरू होऊ शकते. तर याच्या 16GB + 512GB व्हेरिएंट ची किंमत अंदाजे 50,00 रुपये इतकी असू शकते. दरम्यान, iQoo 12 देखील 16GB + 1TB प्रकारात उपलब्ध आहे, ज्याची किंमत अंदाजे रु 53,000 इतकी आहे.

दरम्यान, हे दोन्ही स्मार्टफोन बर्निंग वे, लेजेंड एडिशन आणि ट्रॅक व्हर्जन या रंगांमध्ये उपलब्ध असून, ट्रॅक व्हेरियंटमध्ये बीएमडब्ल्यू मोटरस्पोर्ट फिनिश आहे. तर हे फोने 14 नोव्हेंबरपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन विकले जाणार आहेत. .

जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर iQoo चे हे मॉडेल्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील.