iQOO Z7s 5G : लॉन्च झाला बहुप्रतिक्षित iQOO चा शक्तिशाली 5G फोन! 64MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मिळतोय ‘इतक्या’ स्वस्तात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iQOO Z7s 5G : अनेक दिवसांपासून iQOO Z7s 5G ची चर्चा सुरु होती. कंपनीही अनेक दिवसांपासून त्यावर काम करत होती. अखेर हा फोन कंपनीने लाँच केला आहे. कंपनीकडून यात 64MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी दिली जात आहे.

जर किमतीचा विचार केला तर iQOO Z7s 5G हा फोन तुम्ही 20 हजार रुपयांपेक्षा खरेदी करू शकता. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. परंतु जर तुम्ही HDFC आणि ICICI बँक कार्ड वापरले तर तुम्हाला 1500 रुपयांची सवलत मिळू शकते. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले, 64MP OIS प्राथमिक कॅमेरा, Android 13 दिले गेले आहे. जर त्याच्या किमतीचा विचार केला तर कंपनीकडून हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये लॉन्च केला आहे.

जाणून घ्या किंमत

कंपनीने आगामी फोन iQOO Z7s 5G दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. स्टोरेजचा विचार केला तर त्याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. तर त्याचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. तुम्ही आता अधिकृत वेबसाइटवरून दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सहज स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

हा फोन पॅसिफिक नाईट आणि नॉर्वे ब्लू कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. तो तुम्ही Amazon वरून iQOO Z7s 5G खरेदी करू शकता. या फोनवर HDFC आणि ICICI बँक कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला 1500 रुपयांची सवलत दिली जात आहे.

पहा फीचर्स

iQOO Z7s 5G मध्ये 6.38-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले दिला असून जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 64MP + 2MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. तर फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला असून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करतो.

स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्याय दिला आहे. हा फोन Android 13 वर आधारित FunTouchOS 13 वर काम करतो. यात 4,500mAh बॅटरी आणि 44W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट उपलब्ध असून हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.