Jio 7th Anniversary : कंपनीकडून ग्राहकांना मोठी भेट! ‘या’ प्लॅनमध्ये मिळेल फ्री डेटासह हजारो फायदे, त्वरित घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio 7th Anniversary : जर तुम्ही देशातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना आतापर्यंतची सर्वात मोठी भेट दिली आहे. ज्यात तुम्हाला फ्री डेटासह हजारो फायदे मिळतील.

कंपनी आपला वर्धापन दिन साजरा करत असून या निमित्ताने ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळतील. तुम्हाला 21GB अतिरिक्त डेटासह मोफत Macdonald चा आनंद घेता येईल. परंतु तुम्हाला 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.

रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या या शानदार रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. इतकेच नाही तुम्हाला 7GB चा अतिरिक्त डेटा देण्यात येणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्ही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज मोफत 100 एसएमएसची सुविधाही घेऊ शकता.

जिओच्या 749 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर यात यूजर्सला दररोज 2 GB डेटा देखील देण्यात येत आहे. यासह, इंटरनेटसाठी तुम्हाला 14GB अतिरिक्त डेटा तसेच प्रत्येकी 7GB चे दोन डेटा कूपन देखील मिथिल. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबतच 100 मोफत एसएमएस फायदे देखील उपलब्ध करून दिले आहेत. जिओच्या या प्लॅनची खासियत म्हणजे याची वैधता ९० दिवसांची आहे.

जिओचा 2999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये, ग्राहकांना 1 वर्षापर्यंत म्हणजेच 365 दिवसांची वैधता उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु वरील दोन प्लॅनपेक्षा जास्त, यात तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा देण्यात येईल. याशिवाय 21 जीबी अतिरिक्त डेटा स्वतंत्रपणे इंटरनेट वापरण्यासाठी उपलब्ध असणारा आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येकी 7 GB चे तीन डेटा कूपन देण्यात येई. कंपनीच्या वरील इतर दोन प्लॅन्सप्रमाणे, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे.

इतकेच नाही तर तुम्ही AJIO वरून खरेदी केले तर तुम्हाला एकूण 200 रुपयांची सवलत मिळेल. नेटमेड्सवर 20% सूट आणि स्विगीवर 100 रुपयांची सवलत आणि घरी बसून 149 रुपयांहून अधिकच्या खरेदीवर मोफत मॅकडोनाल्ड जेवण मिळेल. तसेच तुम्हाला फ्लाइटमध्ये 500 रुपयांची सवलत दिली जाईल.