Jio Recharge Plan : जिओचा आकर्षक प्लॅन! फक्त एकदाच रिचार्ज करा आणि मिळवा दिवसाला 3GB डेटासह मोफत Netflix सब्सक्रिप्शन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : इतर टेलिकॉम कंपनीपैकी रिलायन्स जिओच्या प्लॅनच्या किमती खुप कमी असतात. शिवाय कंपनीकडे ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कंपनी मार्केटमधील इतर कंपन्यांना कडवी टक्कर देताना पाहायला मिळते.

सध्या कंपनीने आपले दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्याची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारी आहे. यात कंपनीच्या ग्राहकांना दिवसाला 3GB डेटा, मोफत Netflix सब्सक्रिप्शन आणि JioTV, JioCinema आणि JioCloud सारखे अतिरिक्त फायदेदेखील मिळत आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. 40GB बोनस डेटा देखील तुम्हाला मिळेल. सर्वात महत्त्वाचे यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध करून दिला आहे. जाणून घेऊयात कंपनीच्या या शानदार प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.

रिलायन्स जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या या शानदार प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मिळत आहेत. त्याची वैधता एकूण 84 दिवसांची आहे. सर्वात महत्त्वाचे यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध करून दिला आहे. या प्लॅनमध्ये Netflix Mobile, JioTV, JioCinema आणि JioCloud सारखे अतिरिक्त फायदेदेखील उपलब्ध करून दिले आहेत.

रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. या शानदार प्लॅनची ​​वैधता एकूण 84 दिवसांची आहे. हे 40GB बोनस डेटा देखील देते. या प्लॅनमध्ये Netflix Basic, JioCinema,JioTV आणि JioClou यांचा समावेश आहे.

कंपनीच्या या दोन्ही प्लॅनमध्ये दैनंदिन डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ Kbps इतका कमी होतो. शिवाय या दोन्ही प्लॅनची ​​वैधता 84 दिवस आहे. तसेच पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये जास्त डेटा उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोबाईल ऐवजी नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शनही उपलब्ध करून दिले आहे.