Jio vs Airtel vs Vi : रिलायन्स जिओ, Airtel आणि Vi कोणाचे आहेत 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे स्वस्त प्लॅन्स, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio vs Airtel vs Vi : रिलायन्स जिओ, Airtel आणि Vi या भारतातील सर्वात आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनची किंमत वेगवेगळी आहे. तसेच त्यांच्या प्लॅनचे फायदेखील वेगवेगळे आहेत. कंपनीच्या ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

या कंपन्या सतत टक्कर देताना दिसतात. या तिन्ही कंपन्यांकडे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे स्वस्त प्लॅन्स आहेत. परंतु त्यांचे फायदे वेगवेगळे आहेत. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि इच्छेनुसार प्लँन्स घेऊ शकता. पहा त्यांची सविस्तर यादी.

रिलायन्स जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओ आता आपल्या ग्राहकांसाठी एकूण 84 दिवसांच्या वैधतेसह केवळ 395 रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 6GB इंटरनेट डेटाची सुविधा मिळत आहे. तसेच यात 1000 एसएमएसचा लाभही देण्यात येत आहे. याशिवाय, तुम्हाला Jio अॅप्समध्ये मोफत प्रवेश देखील मिळवता येईल.

Vi स्वस्त रिचार्ज प्लॅन

हे लक्षात घ्या की या तीनही मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये व्होडाफोन आयडिया तिसऱ्या क्रमांकावर असून ते आपल्या ग्राहकांसाठी एकूण 84 दिवसांच्या वैधतेसह 459 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते. यात ग्राहकांना फक्त डेटा नाही तर कॉलिंगचे देखील फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 6GB इंटरनेट डेटा आणि 100 SMS फायदे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कंपनीचे इतरही अनेक प्लॅन आहेत परंतु त्यांची किंमत 459 रुपयांपेक्षा जास्त आहे.

एअरटेल स्वस्त रिचार्ज प्लॅन

दुसऱ्या क्रमांकाच्या प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांमध्ये एअरटेल या कंपनीचे नाव येते. 84 दिवसांच्या वैधतेसह 500 रुपयांखालील एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. आता तुम्ही केवळ 455 रुपयांमध्ये कॉलिंग आणि डेटा फायदे मिळवू शकता. यात ग्राहकांसाठी एकूण 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 6GB इंटरनेट डेटाचा लाभ दिला जात आहे. तसेच त्यांना 900 एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार रिचार्ज करू शकता.