Reliance Jio Unlimited 5G Data : जिओच्या ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे. खरे तर रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहे. कंपनीच्या रिचार्ज प्लॅनच्या पोर्टफोलिओ मध्ये अनेक महाग आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्हाला पाहायला मिळतील.
दरम्यान, आज आपण रिलायन्स जिओच्या अशा एका प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने रिचार्ज केल्यास ग्राहकांना तब्बल 11 महिन्यांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅन सोबत ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा देखील लाभ मिळणार आहे. याशिवाय इतरही अनेक लाभ या प्लॅन सोबत ग्राहकांना मिळत आहेत. अशा परिस्थितीत, आता आपण या प्लॅनचे सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणता आहे तो प्लॅन ?
आम्ही ज्या प्लॅन बाबत बोलत आहोत तो कंपनीचा व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन आहे. कंपनीचा हा 1559 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅन सोबत ग्राहकांना डेटा अनलिमिटेड कॉलिंग असे विविध लाभ मिळतात. या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना 336 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तब्बल 11 महिने रिचार्ज करण्याची कटकट राहणार नाही.
या प्लॅन सोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा तर लाभ मिळतोच शिवाय अनलिमिटेड 5g डेटाचा देखील लाभ मिळणार आहे. मात्र हा अनलिमिटेड 5g डेटा चा लाभ घेण्यासाठी ग्राहकाकडे 5g हँडसेट असणे आवश्यक आहे. शिवाय जेथे 5g नेटवर्क मिळते त्याच भागातील ग्राहकांना या अनलिमिटेड 5g चा लाभ मिळणार आहे. या प्लॅन सोबत रिचार्ज केल्यास ग्राहकांना 3600 sms मिळतात.
याशिवाय 24 जीबी डेटा देखील मिळतो. हा दिलेला 24 जीबी डेटा संपल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने नेट चालणार आहे. या प्लॅन सोबत ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड यांचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. मात्र ग्राहकांना जिओ सिनेमा प्राईमचे सबस्क्रीप्शन मिळणार नाही.
हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडीटी हवी आहे. दुसरीकडे या प्लॅन सोबत मिळणारा अनलिमिटेड 5g चा लाभ हा कॉम्प्लिमेंटरी ऑफर अंतर्गत दिला जात आहे. यामुळे संपूर्ण 11 महिने अनलिमिटेड 5g चा लाभ मिळणारच हे फिक्स नाही.