JioMotive : जिओचे हे स्मार्ट कार डिव्हाईस झाले लॉन्‍च, जाणून घ्या फीचर्स..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JioMotive : रिलायन्स जिओने भारतीय बाजारपेठेमध्ये नुकतेच आपले एक नवीन डिव्हाईस सादर केले असून, हे डिव्हाईस स्वतःच्या कारने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे. दरम्यान, JioMotive असे या डिव्हाईसला नाव देण्यात आले असून, ही कार ऍक्सेसरी आहे. दरम्यान, या डिव्हाईसच्या मदतीने कारच्या परफॉर्मन्स आणि इतर गोष्टींची रिअल-टाइम माहिती मिळते.

दरम्यान, या डिव्हाईसमुळे तुम्हाला तुम्हाला कारच्या परफॉर्मन्सशी संबंधित सगळी माहिती मिळते. ज्यामुळे कोणतीही समस्या येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गाडीची होणारी दुरुस्ती टाळू शकता. दरम्यान, सुरक्षेसोबतच हे डिव्हाईस अनेक स्‍मार्ट फिचर्स देखील देते.

दरम्यान, या डिव्हाईसची भारतामध्ये किंमत 4,999 रुपये आहे. तर हे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म Jio.com व्यतिरिक्त, Amazon आणि Reliance Digital वर सुद्धा उपल्बध आहे.

हे उपकरण वाहनाशी संलग्न केल्यानंतर, JioThings अॅपवर कारची उपस्थिती 24 तास ट्रॅक केली जाऊ शकते. वापरकर्ते अॅपवर जिओ फेन्सिंग तयार करू शकतात. ते कोणत्याही आकाराचे असू शकते. जेव्हा तुमची कार या जिओ फेन्सिंगमध्ये प्रवेश करते किंवा बाहेर पडते तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळतो.

JioMotive हे डिव्हाईस तुमच्या कारच्या आरोग्यावर लक्ष ठेवते. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कारमध्ये कोणतीही मोठी समस्या येण्याआधीच तुम्हाला तर सतर्क करते. हे डिव्हाइस तुमची ड्रायव्हिंग वर्तणूक देखील लक्षात घेते. याचा अर्थ तुम्ही इंधनाबाबत किती जागरूक आहात. तुम्ही जोरात ब्रेक लावत नाही की नाही आणि गती कशी वाढवायची हे समजून घेऊन तुमच्या सवयी सुधारण्याचासुद्धा प्रयत्न करते.

JioMotive मध्ये कारमधील वाय-फाय, स्पीड ट्रॅकिंग, 10 सेकंद लेटन्सी ही वैशिष्ट्ये आहेत. या उपकरणाद्वारे, आपण केवळ आपल्या ड्रायव्हिंगमध्ये सुधारणा करू शकत नाही तर आपल्या कारची काळजी देखील घेऊ शकता. एकंदरीत आपल्या कारमधील अनेक गोष्टींवर हे लक्ष ठेवून आपल्याला माहिती देते. जेणेकरून आपल्या कारला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये.