Lava Blaze Duo Smartphone:- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये आपल्याला अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन दिसून येतात व काही हजारापासून तर लाखो रुपये किमतीचे स्मार्टफोन आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपल्याला अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन पाहायला मिळतात.
त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या आर्थिक बजेट नुसार स्मार्टफोन निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत व यामध्ये आता लावा ही कंपनी देखील मोठी एन्ट्री करण्याच्या तयारीत असून लावा या कंपनीचा Lava Blaze Duo हा दोन डिस्प्ले असलेला स्मार्टफोन लवकर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे उत्तम अशी फीचर्स पाहायला मिळणार असून अनेक दिवसानंतर लावा भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये एन्ट्री करत आहे. अशा परिस्थितीमध्ये हा स्मार्टफोन खूप खास असणार आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे.
म्हणजेच हा फोन दोन्ही बाजूंनी वापरण्यासाठी सक्षम असेल. मिळालेल्या माहितीनुसार लावाच्या या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला देखील डिस्प्ले असेल. या अगोदर देखील लावाने ड्युअल स्क्रीनसह लावा अग्नी 3 स्मार्टफोन लॉन्च केला होता व तो ग्राहकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आता लावा भारतीय बाजारपेठेत लावा ब्लेज डीओ हा स्मार्टफोन लॉन्च करत आहे.
कसा असणार लावाचा Lava Blaze Duo?
कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉन्चची डेट डिक्लेअर केली असून ती साधारणपणे 16 डिसेंबर 2024 आहे व या दिवशी हा स्मार्टफोन भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर लाईव्ह सेलद्वारे लॉन्च केला जाणार आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 3D AMOLED डिस्प्ले दिला असून त्यासोबत स्क्रीन देखील दिली आहे. तसेच याचा रिफ्रेश रेट 120Hz असणारा असून या फोनची बॅक स्क्रीन 1.5 इंचाची असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन आठ जीबी रॅम आणि 128 जीबी ROM सह येणार आहे.
म्हणजेच वापरकर्त्यांना या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज जास्त मिळणार असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करेल. तसेच लावाच्या या Blaze Duo स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
तसेच कॅमेरा देखील उत्कृष्ट असणार असून यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 16 मेगापिक्सल सोनी द्वारे दिला जाणार आहे तर सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असणार आहे.